काळ आला होता पण वेळ आली नव्हती
जीवन मरणाच्या गोष्टी या आधीच लिहून ठेवलेल्या असतात, असे म्हटले जाते. जगात कधी कोणाचे काय होईल, ते सांगता येत नाही. आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग आले असावे ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसावा. बऱ्याचदा कोणाचा अचानक मृत्यू झाल्याचे समजते तर कधी अचानक कोणी भयंकर परिस्थीतून बाहेर आल्याचे समजते. साध्या अशीच एक धक्कादायक घटना घडून आली आहे. ज्यात एक व्यक्ती चक्क मृत्यूच्या वेळख्यातुन बाहेर आला आहे.
सोशल मीडियावर नेहमीच आपल्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी घडताना दिसत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ अनेक वेगवगेळ्या प्रकारचे असतात. यातील काही व्हिडिओ आपल्याला पोट धरून हसवतात तर काही थक्क करून जातात. सध्या असाच एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या अंगावरून एक ट्रेन भरधाव वेगाने निघून जाताना दिसते मात्र इतकी मोठी घटना घडल्यानंतरही त्या व्यक्तीला कोणतीही दुखापत होत नाही. अंगावर ट्रेन गेल्यानंतरही व्यक्ती जिवंत बाहेर आल्याचे पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत.
हेदेखील वाचा – Poster Viral: चुडीदार ड्रेस, हातात दुधाचा हंडा अन् उत्सवाच्या पोस्टरवर झळकली मिया खलिफा
हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून समोर आला आहे. ट्रेन आपल्या गतीने आपल्या गंतव्यस्थानाकडे जात असताना अचानक एक व्यक्ती लोकोमोटिव्ह समोर दिसली. एका व्यक्तीला ट्रेनने धडक दिल्याची माहिती लोको पायलटने जीआरपीला दिली. यानंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांना धक्काच बसला. हे प्रकरण बुधवारी रात्री उशिरा बिजनौर शहर कोतवालीचे आहे.
जब यमराज जी छुट्टी पर हों तो ऐसा होता है…
UP के जिला बिजनौर में एक शख्स नशे में रेल पटरी पर सो गया। ट्रेन ऊपर से गुजर गई। लोको पायलट ने पुलिस को सूचना भिजवाई कि एक व्यक्ति संभवत ट्रेन से कट गया है। पुलिस पहुंची तो वो नशे में सोता मिला। pic.twitter.com/43j6Bm0lW7
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 8, 2024
वास्तविक, एक व्यक्ती दारुच्या नशेत धुंद होऊन रेल्वे रुळावर झोपला होता. त्याला कोणीतरी पाहिले आणि एक व्यक्ती रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याची बातमी पोलिसांनी दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ती व्यक्ती जिवंत असल्याचे पाहून ते चक्रावून गेले. पोलिसांनी त्याला उचलले आणि नीट त्याची पाहणी केली असता त्याला कोणतीही दुखापत न झाल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्याला उठायला सांगितल्यावर तो धक्काबुक्की करू लागला, यावरून तो दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. चौकशीत त्याने सांगितले की, तो नेपाळचा रहिवासी असून त्याचे नाव अमर बहादूर आहे. अमर बहादूरच्या अंगावरुन संपूर्ण ट्रेन गेली होती, त्याला जिवंत आणि सुस्थितीत पाहून रेल्वे पोलिसांनाही आश्चर्य वाटले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याचा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.