बेंगळुरूच्या KGF मध्ये अवघ्या 5 सेकंदात दुमजली इमरतीचा झाला चुराडा, धडकी भरवणारा Video Viral
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज हे नेहमीच व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ अनेकदा आपले मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात मात्र यात बऱ्याचदा काही अशा घटनांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात, ज्यांना पाहून आपला थरकाप उडेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दुमजली इमारत जमिनीवर कोसळताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही सेकंदातच ही संपूर्ण घटना घडते, ज्याने सर्वजण हादरून जात.
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, बेंगळुरूमधील KGF (Kolar Gold Fields) येथे ही घटना घडली आहे. इथे एक इमारत काही वेळातच कोसळली. अहवालानुसार, इमारतीमध्ये रिनोव्हेशनचे काम सुरू होते, त्यामुळे इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या. पोलीस आणि अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहोचले. इमारत कोसळण्यापूर्वी त्यांनी लोकांना सुखरूप बाहेर काढले होते, त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना केव्हा घडली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
हेदेखील वाचा – नातवाच्या अंत्यसंस्कारावेळी पार्थिवासमोर जाऊन नाचू लागले आजोबा, पाहून तुम्हालाही बसेल धक्का, Video Viral
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच फार वेगाने व्हायरल झाला. लोक व्हिडिओतील थरार दृश्ये पाहून अचंबित झाले आहेत. मात्र मुख्य म्हणजे, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सुदैवाने सर्व लोक सुखरूप बाहेर आले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. यात लिहिले आहे, ‘KGF च्या बांगरपेट येथे एक बहुमजली इमारत कोसळली… इमारतीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते त्यामुळे भेगा पडल्या.. तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि इमारत कोसळण्यापूर्वी सर्वांना बाहेर काढले’.
A multistorey building collapsed in Bangarpet of KGF… Renovation work was going on in the building which led to the cracks.. Immediately Police and fire personnel reached the spot and evacuated everyone before the building collapsed..@sp_kgf pic.twitter.com/YrX9K15Qzj
— Yasir Mushtaq (@path2shah) November 8, 2024
हेदेखील वाचा – आज्जी जोमात पाहणारे कोमात! फटाक्यांची पेटती माळ हातात मिरवत आज्जींनी संपूर्ण रस्त्यावर नाचवली, Video Viral
या घटनेचा व्हिडिओ @path2shah नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खरंच खूप वेळेवर लोकांना बाहेर काढले ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे भीतीदायक आहे, लोक अशा घरात कसे राहत असावेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे बेंगळुरूचे वैशिष्ट्य आहे. इथे अशा अनेक इमारती आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.