मागेच देशभरात दिवाळी या सणाची मनसोक्त मजा लुटण्यात आली. भारतातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. दिवाळीनिमित्त जागोजागी दिव्यांची रोषणाई, फराळ आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी आणि फटाके फोडले जातात. लोक फटाक्यांच्या गजरात हा सण साजरा करतात. मात्र हे फटाके फार सावधानतेने फोडायला हवेत नाहीतर मोठा अपघात घडू शकतो. लोक अनेकदा फटक्यांसोबत नको ते करायला जातात आणि मग आयुष्यभर पस्तावत बसतात. अनेकदा हे फटाके उत्साहात लोक हातात फोडायला बघतात मात्र असे करताना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते.
फटाके हातात फोडल्यामुळे झालेल्या अनेक दुर्घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. मात्र सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात कोणी तरुण मुलं नाही तर चक्क एक आजीबाईच फटाक्यांची मजा लुटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे यावेळी या आजी चक्क आपल्या हातात जळत्या फटाक्यांची माळ घेऊन फोडताना दिसून येत आहे. ज्या फटाक्यांना पाहून आपण दुरूनच पळू लागतो त्यांना हातात फोडताना पाहून आता अनेक युजर्स थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – अति घाई कारचालकाला पडली महागात, ओव्हरटेकच्या नादात गाडी पुलावरून पडली खाली, मृत्यूचा थरारक खेळ Viral
काय आहे व्हिडिओत?
आजींच्या धाडसाचा एक मजेदार पण धक्कादायक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील चालू रस्त्यावरचे एक अलौकिक दृश्य दिसून येत आहे. मधोमध रास्ता आणि याच्या आजूबाजूला काही घर आहेत आणि यात लक्षणीय ठरत असलेली बाब म्हणजे, एक आजी या रस्त्याच्या मधोमध जळती फटाक्यांची माळ अक्षरशः हातात घेऊन मिरवताना दिसून येत आहेत. आजींचा हा पराक्रम पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा – जीवाशी खेळ! मस्ती मस्तीत पेटता सुतळी बॉम्ब तरुणाने टाकला मित्राच्या तोंडात अन्… धक्कादायक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @world_tuluvas_network नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले आहे तसेच काहींनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जगातील सर्वात धाडसी अज्जी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजी रॉक्स” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजी रॉक लोक शॉक”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.