जीवाशी खेळ! मस्ती मस्तीत पेटता सुतळी बॉम्ब तरुणाने टाकला मित्राच्या तोंडात अन्... धक्कादायक Video Viral
मागील आठवड्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. दिवाळी हा भारताचा एक प्रमुख सण आहे. या सणानिमित्त सर्वत्र दिव्यांची रोषणाई पाहायला मिळते. तसेच या सणादरम्यान अनेक लोक फटाके देखील फोडत असतात. फटाके फोडून लोक आपला आनंद व्यक्त करत असतात. दिवाळीत फटाके फोडण्याची एक परंपराच आहे मात्र असे करताना स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे फार महत्तवाचे आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. अनेकजण या फटक्यांसोबत नको ते स्टंट करत असतात.
दरवर्षी फटाक्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात लोक फटक्यांसोबत अनेक निरनिराळे स्टंट करताना दिसून येतात. हे स्टंट्स बऱ्याचदा जीवघेणे ठरत असतात. विशेषतः फटाक्यांमधील रासायनिक घटक आणि त्यांचा ज्वलंत प्रकाश आपल्या जीवासाठी घातक ठरत असतो अशात याच्याशी केलेली मस्ती चांगलीच महागात पडू शकते. मजा मस्तीत लोक फटाक्यांशी निरनिराळे प्रयोग करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तरुण चक्क जळता सुटली बॉम्ब आपल्या मित्राच्या तोंडात टाकताना दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – या किड्याचे नाव ‘ ‘Donald Trump’ का आहे? वैज्ञानिकांचे कारण ऐकून पोट धरून हसाल
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दोन मित्र फटाके वाजवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी एकजण हातात फटका घेऊन उभा आहे तर दुसरा हा फटाका पेटवण्याचा तयारीत आहे. हे दोन मित्र पेटवत असलेला फटका आहे साधासुधा फटाका नसून सुतळी बॉम्ब आहे ज्याला पाहून अनेकजण दूर पळत असतात. असो पुढच्याच क्षणी तरुण हा सुतळी बॉम्ब पेटवतो आणि आपल्या मित्राच्या तोंडात घालतो. ही फार अनपेक्षित गोष्ट होती. ज्यामुळे समोरच्या मित्राला देखील धक्का बसतो. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून मित्राची ही कृती पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता हा बॉम्ब खरा होता ही खोटा याबाबत कोणती माहिती पुरवलेली नाही.
हेदेखील वाचा – सापाशी जीवघेणा खेळ व्यक्तीला पडला महागात, थेट जिभेवर घेतला चावा, Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप
हा व्हायरल व्हिडिओ @khatam_bhaiiiii_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेक युजरने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावा, हे मजेशीर नाही” तर दुसऱ्या युजरने लिहले आहे, “मी नर्सिंग स्टाफ आहे. गेल्या वर्षी एक रुग्ण दाखल झाला ज्याच्या तोंडात बॉम्बस्फोट झाला होता आणि तो मरून गेला…. असे काही करू नका”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.