साप हा धोकादायक प्राण्यांपैकी एक मानला आहे. तो आपल्या विषारी दंशासाठी ओळखला जातो. याचा दंश इतका विषारी असतो की, एकदा का कोणाला सापाने कोणाला दंश केला तर त्याचे जिवंत वाचणे काही सोपे नाही, तो मग थेट मृत्यूच्या दारीच पोहचतो. सापाला पाहून प्राणीच काय तर माणसंही थरथर कापू लागतात. याला पाहताच लोक आपली वाट बदलतात. अशात सापाची थट्टा करणे फार महागात पडू शकते. त्याच्याशी केलेली थट्टा ही आपल्या जीवावर देखील बेतू शकते. याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सापाशी केलेली मजा एका व्यक्तीला चांगलीच महागात पडल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे हे दृश्य पाहून लोकांना विचार करायला भाग पाडले जाते की या व्यक्तीने असे धोकादायक कृत्य का केले असावे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती सापाशी मस्ती करताना दिसून येत आहे. यावेळी त्याच्या आजूबाजूची लोक देखील त्याला असे करण्यास उत्तेजित करत असतात. व्यक्ती सापाला आपल्या गळ्यात अडकवतो आणि त्याच्या तोंडासमोर आपली जीभ घेऊन जातो. मग काय शेवटी नको तेच घडते आणि व्यक्तीला आपल्या या चुकीची फार मोठी रक्कम मोजावी लागते.
हेदेखील वाचा – वाघाच्या तोंडात हाथ घालून तरुण करत होता स्टंटबाजी तितक्यात वाघाने केलं असं…आयुष्यभराची घडली अद्दल, Video Viral
व्यक्ती अतिशहाणपणा करत आपली जीभ या सापाचा जवळ नेतो आणि साप लगेच त्याची जीभ पकडून त्यावर चावा घेतो. सापाचा पलटवार संपूर्ण परिस्थिती आणखीनच भयावह बनवतो. अशा कृती कोणत्याही व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकतात, कारण सर्पदंश जीवघेणा ठरू शकतो. यानंतर या व्यक्तीचे नक्की झाले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा – आपली क्षणिक चूक तरुणाला पडली महागात! हातात फुटला ज्वलंत फटाका अन् Viral Video पाहून लोकांना बसला शॉक
हा व्हायरल व्हिडिओ @itz__akhil__5k नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांनी स्पाचेर विषारी दात काढले आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” निश्चितपणे ही एक प्राणघातक किस आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या जगात किती वेडे लोक आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.