नवी दिल्ली – खूप कमी कर्मचारी (Empyoee) असतात की ज्यांना आपण करत असलेली नोकरी (Job) मनापासून आवडत असते. पण जेव्हा काम करण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना किमान जबाबदारीची जाणीव असते. प्रामाणिकपणे त्यांना देण्यात आलेलं काम पूर्ण करण्याचा ते प्रयत्न तरी करीत असतात. मात्र एखादीच अशी व्यक्ती असते की जी आपल्याला नेमून दिलेलं काम टाळण्यात आणि बेजबाबदारपणे वागण्यात माहीर असते. अशी माणसं काम कसं टाळायचं यात प्रावीण्य मिळवून असतात.
[read_also content=”केवढं ते प्रेम! पाळीव कुत्र्याच्या वाढदिवसाला 11 किलोचा केक, पाहुण्यांना रिटर्न गिफ्टमध्ये रेफ्रिजरेटर दिला भेट https://www.navarashtra.com/viral/meerut-college-professor-shamim-ahmed-celebrates-the-birthday-of-his-pet-dog-gifts-a-refrigerator-to-a-guest-nrps-411296.html”]
दक्षिण चीनमधल्या (China) एका वृत्तसंस्थेनं अशाच एका कामचुकार कर्मचाऱ्याची बातमी प्रसिद्ध केलेली आहे. हा कर्मचारी ऑफिसात काम करण्याचं सोडून 6-6 तास ऑफिसच्या टॉयलेटमध्ये (Toilet) जाऊन बसत होता. ऑफिसात आल्यानंतर थोड्या-थोड्या वेळानं टॉयलेटमध्ये बसणे, हा त्याला छंदच जडलेला होता. सुरुवातीला ही बाब कामाच्या रगाड्यात फारशा कुणाच्या लक्षात आली नाही. मात्र नंतर जेव्हा हे सत्य समोर आलं, तेव्हा या टॉयलेट ब्रेकमुळं या कर्मचाऱ्याला नोकरीला मुकावं लागलं आहे.
वांग नावाचा हा कतर्मचारी 2006 साली एखा खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. 2013 सालापर्यंत तो कंत्राटाच्या पद्धतीनं या ठिकाणी नोकरी करीत असे. 2014 साली या कर्मचाऱ्याला पचनाबाबत आजार झाला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतरही त्याला बऱ्याच व्याधी आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच दिवसातून 3 ते 6 तास हा पठ्ठ्या टॉयलेटमध्ये जाऊन बसत असे.
आजारपणामुळे हे करावं लागत असल्याचं या कर्मचाऱ्याचं म्हणणं होतं. त्याचा रेकॉर्ड जेव्हा तपासण्यात आला त्यावेळी दिवसातील 196 मिनिटं म्हणजे तीन तासांच्या वर तो टॉयलेटमध्येच जाऊन बसत होता. त्यानंतर कंपनीनं त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं. या मुद्द्यावर या कर्मचाऱ्यानं कोर्टात धाव घेतली. कोर्टात न्यायाधीशांनीही या कर्मचाऱ्याला चांगलंच सुनावलं. आता सोशल मीडियावर ही बाब चांगलीच चर्चिली जातेय.