Allegations of Prostitution at Luxury Care, Questions Raised Over Police Action ( 'लक्झरी केअर'मध्ये वेश्याव्यवसायाचे आरोप; पोलिसांच्या कारवाईवर उपस्थित झाले प्रश्न ) फोटो सौजन्य AI
छातीवर काळुबाईचं नाव आणि कर्म काळे ? मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या एका तरुणाला नालासोपाऱ्यातील एकाने चांगलेच झापले आहे. हा तरुण वसई येथला स्थायिक असून तो नालासोपाऱ्यात मसाज पार्लर चावतोय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याच्या या मसाज पार्लरची चांगलीच पोलखोल केली आहे. तसेच नालासोपाऱ्यात याआधी सुध्दा 26 मुली देहव्यापाराच्या धंद्यामध्ये पकडल्या गेल्या आहेत. असे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.
ℕ𝔸𝕃𝔸𝕊𝕆ℙ𝔸ℝ𝔸 | 𝕍𝕀ℝ𝔸𝕃 𝕍𝕀𝔻𝔼𝕆 | Public Knows, But Does the Police? Alleged Sex Trade at Nalasopara Massage Parlour Raises Serious Questions | Alleged Sex Trade Under the Guise of a Massage Parlour in Nalasopara West! Questions Raised Over Police Surveillance If the public knows about it, why is the police administration seemingly unaware? Serious allegations have surfaced against ‘Luxury Care’ massage parlour in Nalasopara West, where alleged prostitution activities were reportedly being carried out under the guise of massage services. The allegations have raised serious questions about local police surveillance and accountability. If ordinary citizens can become aware of such alleged illegal activities, why did the local police and concerned authorities fail to detect them? Was the establishment ever inspected? If complaints were received, what action was taken? How can the public know about such activities while the police remain seemingly unaware? Who will be held accountable? The @MBVVPOLICE should conduct a fair and impartial investigation, establish the facts and take strict legal action against those responsible if the allegations are proven. — ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) November 18, 2026
मिळालेल्या माहिती नुसार जर सामान्य जनतेला या गोष्टीची माहिती असू शकते, तर पोलीस प्रशासनाला याची कल्पना कशी नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नालासोपारा पश्चिमेकडील ‘लक्झरी केअर’ (Luxury Care)नावाच्या एका मसाज पार्लरमध्ये खुलेआम देहविक्री होत असून हा प्रकार सुरू असून या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांच्या देखरेखीवर आणि त्यांच्या जबाबदारीवर मोठा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान
जर नालासोपाऱ्यातील सामान्य नागरिकांना या बद्दल माहिती मिळू शकते, तर स्थानिक पोलीस आणि संबंधित प्रशासनाला हे का कळाले नाही? या आस्थापनेची कधी तपासणी करण्यात आली होती का? जर काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तर त्यावर काय कारवाई करण्यात आली आहे. जनतेला अशा गोष्टींची माहिती मिळते, पण पोलिसांना मात्र काहीच माहीत नसते, हे कसे शक्य आहे? याला जबाबदार कोण? असा सवाल लोक उपस्थित करू लागले आहेत.
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीसांनी या घटनेची सखोल चौकशी करुन या घटनेतील सत्य समोर आणावे आणि जर आरोप सिद्ध झाले, तर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी स्थानिक लोकांकडुन केली जात आहे.
Ans: 'लक्झरी केअर' (Luxury Care) या मसाज पार्लरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Ans: मसाज पार्लरच्या नावाखाली कथित देहविक्री सुरू असल्याचा आरोप करत एका तरुणाला जाब विचारला जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Ans: स्थानिक नागरिकांना या प्रकाराची माहिती असताना पोलीस प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही.






