मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जंगलात असा एक प्राणी आहे जो त्याच्या कळपातील सदस्यांची खूप काळजी घेतो हेच सदस्य हा प्राणी वृद्ध झाल्यावर त्याला कळपातून बादेर काढतात. कोणता आहे हा प्राणी जाणून घेऊयात.
वडगाव मावळमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तिकोना गावात "सिंग बंगल्यावर" बनविभागाने धाड टाकली. शिकारीचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
गैर मार्गाने माती उपसणाऱ्यांमुळे असंख्य जुनी झाडे मुळापासून नष्ट होत आहेत. या माफियांनी आता लाल मातीसाठी भीमाशंकर अभयारण्य भागातील जमिनीजमिनीवर धडक दिली असून वन विभाग सुस्त आहे.
साताऱ्यामध्ये वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे. आसनी येथील भोगवटदार वर्ग दोन जमिनीमध्ये झालेल्या वृक्षतोडीचा प्रकार झाला असून याची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राजापूर तालुक्यात भर वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी वनविभागाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
चिपळूण तालुक्यातील टेरव येथे अवैधरित्या कोळसा भट्ट्या सुरु असून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
वन विकास महामंडळाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक असा ५ कोटी ८२ लक्ष रुपयांचा लाभांश राज्य शासनाला दिला आहे. या रकमेचा धनादेश वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री…
पुण्यात सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसाळ्यात पुण्यातील भीमाशंकर अभयारण्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, पावसाळ्यात हा परिसर धोकादायक होत असल्याने भीमाशंकर अभयारण्य ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्यटकांसाठी…
बिबट्या पिंजऱ्यात तर दुरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला नव्हता. त्याला पकडण्यासाठी रात्री सातनंतर रो-रो सेवा आणि ग्रामस्थांचा वावरही बंद करण्यात आला होता.
चंदपूरच्या जंगलातून घोषित चारपैकी दोन वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात येणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि वनविभागातर्फे त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळून मोहीम आखणी केली जात आहे.