पिसारा फुलवून नाचत होता मोर तेवढ्यात वाघाने केला हल्ला अन् पुढे जे झालं... Viral Video एकदा पहाच
मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे तर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे मात्र हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होते याचा एक उत्तम व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मोर आपल्या पिसाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. पिसारा फुलवून त्याचा नाच पाहणे, हे अनेकांचे स्वप्न असते. आपण शहरांमध्ये राहत असल्याने अनेकांची ही संधी हुकते. काहींनी तर आपल्या उभ्या आयुष्यात प्रत्यक्षात मोराचे दर्शन घेतेलेच नसते.
हेदेखील वाचा – Viral Video: बांगलादेशमध्ये इस्लामवाद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या हिंदूंना भररस्त्यात मारहाण? सत्य काय… जाणून घ्या
अशातच आता एका मोराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात हा मोर आपला पिसारा फुलवून. बेफाम होऊन नाचण्याचा प्रयत्न करतो मात्र तितक्यात मागून एक वाघ येतो, तो मोरावर हल्ला करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघतो आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी धाव घेतो. यावेळी आजूबाजूला आणखीन काही मोरदेखील असल्याचे दिसून येते. वाघाने हल्ला केलेला पाहताच सर्व मोर तेथून पळून जातात आणि पिसारा फुलवून नाचू पाहणारा मोरदेखील पळत झाडावर जाऊन बसतो.
वाघ मात्र खालूनच हे सर्व पाहत बसतो आणि काहीच होणार नाही असा विचार करत तेथून निघून जातो. वाघ हल्ला करत असताना अनेकांचा श्वास रोखतो, अनेकांना वाटते की आता मोराचे काही खरे नाही मात्र मोर आपली सुटका करण्यात यशस्वी ठरतो. या व्हिडिओच्या शेवटी वाघ हार मानत आपल्या गुहेत जाताना दिसतो, जिथे त्याची लहान पिल्ले त्याची वाट बघत बसलेली असतात. या घटनेचा रोमांचक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचा व्हिडिओ @rawrszn नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.