बांगलादेशची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असताना तेथील अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील अनेक व्हिडिओजमध्ये बांगलादेशी हिंदूंवर अन्याय होत असल्याचा दावादेखील करण्यात येत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ कितपत खरा आणि यामागची सत्यता आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. या व्हिडिओमध्ये बांगलादेश सैन्याने कट्टर इस्लामवाद्यांच्या विरोधात निषेध करणाऱ्या बांगलादेशी हिंदूंना भररस्त्यात मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे आता सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊयात.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Baba Banaras नावाच्या अकाऊंटवरून हा व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “बांगलादेशी हिंदूंचा बलात्कार आणि हत्या केल्याबद्दल कट्टरपंथी इस्लामवाद्यांचा निषेध करत असताना बांगलादेशी लष्कराने हिंदू आंदोलकांवर हल्ला केला. लहान मुले आणि महिलांसह अनेक लोक यात जखमी झाले”, असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
https://twitter.com/RealBababanaras/status/1822804078595826158
मात्र व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केल्यांनतर 7 जुलै रोजी पोस्ट केलेली एक फेसबुकी पोस्ट हाथी आली. ज्यातील भाषांतरात म्हटले आहे की, बोगरा येथे सनातन धर्माच्या रथयात्रेदरम्यान सहा जणांना विजेचा धक्का बसला, यात 35 जण जखमी झाले. ते रथ घेऊन पोलिस लाईन शिवमंदिराच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे. यावेळी रथाचा वरचा भाग विजेच्या मेन लाइनमध्ये अडकतो.
त्याचबरोबर अशीच एक बातमी सापडली असता यात ज्यात व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम कीफ्रेम होत्या. बोगरा येथील रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यूप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
तसेच नमुना टीव्हीवर त्याबद्दलचा व्हिडीओ बातम्यांचा अहवालदेखील सापडला. या अहवालातही व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दाखवलेले दृश्य होते.
तौसिफ अकबर, बांगलादेशचे एक वरिष्ठ फॅक्ट चेकर यांनी या व्हायरल व्हिडिओचे व्हेरिफेकेशन केले असून हा व्हिडीओ अलीकडचा नसून प्रत्यक्षात बोगरा (बोगुरा) येथील रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का लागून झालेल्या अपघाताचा व्हिडिओ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निष्कर्ष:
बोगरा येथील रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का लागल्याचा जुना व्हिडीओ आता चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात आहे. हा व्हिडिओ बांगलादेशातील हिंदूंवर बांगलादेश लष्कराने अलीकडे हल्ला केल्याचा सांगून व्हायरल केला जात आहे, पण व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट होत आहे.