Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बगळा VS घार: एका माशासाठी अवकाशात रंगले थरारक युद्ध, एकाने मारली चोच तर दुसऱ्याचा पलटवार, लढतीचा Video Viral

Animal Batttle Video: घार आणि बगळ्यामध्ये रंगलं थरारक युद्ध! शेवटी मासा आला कोणाच्या हाथी? कोण पडलं कोणावर भारी? दोन अनुभवी आणि धोकादायक शिकाऱ्यांची लढत एकदा पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2024 | 11:22 AM
बगळा VS घार: एका माशासाठी अवकाशात रंगले थरारक युद्ध, एकाने मारली चोच तर दुसऱ्याचा पलटवार, लढतीचा Video Viral

बगळा VS घार: एका माशासाठी अवकाशात रंगले थरारक युद्ध, एकाने मारली चोच तर दुसऱ्याचा पलटवार, लढतीचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगली प्राण्यांमधील हाणामाऱ्या नेहमीच सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. प्राण्यांच्या जीवनाशी निगडित असे हे व्हिडिओज पाहायला लोकांना फार आवडते, यातून त्यांचे जीवन आणखीन जवळून पाहता आणि समजता येते. प्राण्यांचे जीवन हे संघर्षाने भरलेले असते, आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांना त्यांना एकमेकांची शिकार करून जीवन जगावे लागते. अशात काही शिकारी प्राण्यांच्या थरारक शिकारीचे अथवा लढतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. वाघ, सिंह, बिबट्या, मगरी यांच्या खतरनाक शिकारीच्या व्हिडिओजचा समावेश असतो.

सध्या अवकाशातील शिकाऱ्यांच्या थरारक लढतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक बगळा आणि घार भर अवकाशात एका माशांसाठी एकमेकांना लढत देत असल्याचे दिसून येत आहे. हे दोघेही अनुभवी आणि खतरनाक शिकारी आहेत अशात दोघांमधील या युद्धात नक्की कोण कोणावर भारी पडतं? आणि कोणाचा यात विजय होतो? हे पाहणे फार मजेदार ठरते.

अजगराला किस करण्याची चूक तरुणाला पडते महागात, क्षणार्धात घडतं असं काही… आयुष्यभर करेल पश्चाताप, Video Viral

काय आहे व्हिडिओत?

घारीची नजर ही फार तीक्ष्ण असते, ती बऱ्याचदा अचूक हल्ला करते. दुसरीकडे बगळा देखील यात काही कमी नाही, तो संयमाने अचूक वेळ साधतो आणि आपल्या शिकाऱ्याला मृत्यूच्या घाटात पाडतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत या दोन्ही शिकाऱ्यांमधील एका माशासाठी रंगलेली एक थरारक लढत दिसून येत आहे. यात सुरुवातीला निळ्याशार अवकाशात घार घार आपल्या एका पायात मासा घेऊन उडत असल्याचे दिसते. तितक्यात मागून बगळा हवेला चिरत वेगात येतो आणि थेट घारीच्या पायातील मासा आपल्या तोंडात पकडून खाली उतरतो. घारीला काही समजेल तेवढ्यात बगळा आपली ही शिकार फस्त करून टाकतो. अखेर घार आणि बगळ्यातील या लढतीत बगळा विजयी ठरतो आणि घारीला आपली हार पत्करावी लागते.

भररस्त्यात चारचाकीची घोडागाडीला धडक, गाडीचा चक्काचूर अन् घोडा थेट… मृत्यूचा थरारक Video Viral

पक्ष्यांच्या लढतीचा हा व्हिडिओ @mark.smith.photography नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 5 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या लढतीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो मासा हवा वाटतोय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निसर्ग खूप क्रूर आहे पण सुंदर आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Black kite fights vs herons dangerous fight for fish animal video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 11:22 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral
1

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.