पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! हसणं आपल्या आरोग्यसाठी फार फायद्याचं असतं. रोजच्या धावपळीच्या जगात लोक हसायला कुठेतरी विसरून गेले आहेत. अशात चेहऱ्यावर हास्याचा मोहर फुलवायचा असेल तर हे जोक्स एकदा वाचून पाहा.
मुलगी दुकानात गेली..
मुलगी – २ बीएचकेची किंमत किती आहे?
दुकानदार – हे रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे..
मुलगी – पण बाहेर लिहिले आहे ‘फ्लॅट ७०% ऑफ’..?
दुकानदार कोमात….
आई – असं वाटतंय की तू आमच्या नावाला कलंक लावणार आहेस?
मुलगी – का आई, तुला असं का वाटलं
आई – तो बंगाली मुलगा तुझा हात पकडून होता, तू त्याला नाही का म्हटलं नाहीस?
मुलगी – मी कशी नाही म्हणणार आई, मला बंगाली बोलता थोडी येत
आईने लगेच कपाळाला हात लावला…
चमन – आई, मी देवासारखा दिसतो का?
मम्मी – नाही बेटा, पण तू हे का विचारतोस?
चमन – कारण मी जिथे जातो तिथे… सगळे म्हणतात ‘अरे देवा हा परत आला’
चिंटू – मम्मी, तुला ती प्लेट आठवते का? ज्याबद्दल तुला नेहमीच काळजी वाटत राहते की ती तुटून तर जाणार नाही ना…
मम्मी – हो रे पण तू हे का विचारतोय?
चिंटू – अगं तुझी काळजी संपली आहे
आई – ते कसं?
चिंटू – ती प्लेट आज सकाळीच माझ्या हातून फुटली
मग काय, आईने चिंटूला बदड बदड बदडला …
मुलगा आणि मुलगी एका रेस्टॉरंटमध्ये गेले
वेटर – मॅडम, तुम्हाला काय खायला आवडेल?
मुलगी – भैया माझ्यासाठी एक भाजीवाली रोटी आण.
वेटर – काय??
मुलगा – ती गावाहून आली आहे, तीला पिझ्झा हवा आहे…
एक मुलगा बराच वेळ एका सुंदर मुलीकडे पाहत होता..
मुलगी (रागाने) – तू काय पाहत आहेस?
मुलगा (घाईत) – पाहतोय की जर तू माझी आई असती तर मीही आज सुंदर असतो….
नवरा – ४ तास कुठे गायब होतीस…
बायको – मी शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये गेले होते
पती – तू मॉलमध्ये काय खरेदी केलीस, डार्लिंग
बायको – एक हेअरक्लिप आणि ४५ सेल्फी…
मुलीचे नवीन नवीन लग्न झालं
सासू मुलीला म्हणाली – सुनबाई तुझा इथे पहिला दिवस आहे, तुझं जे मन करेल ते बनव आज…
मुलगी ५ मिनिटाने दारूचा पेग घेऊन आली आणि
म्हणाली – सासूबाई, सोड्यासोबत देऊ की पाण्यासोबत?
चमन – तुम्हाला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं
अमन- का रे तुला असं का वाटतं?
चमन – कारण जर मोगॅम्बोचं लग्न झालं असतं तर तो कधीही म्हणाला नसता की, मोगॅम्बो खुश झाला
Web Title: Chaman said aman did you know mogambo was not married the reason will make you laugh out loud read funniest marathi jokes