Panchat Jokes Teacher Asked Bandu What Is The Relationship Between The Earth And The Moon Read The Funny Answer To Laugh Out Loud
पांचट Jokes : शिक्षक: पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? शेवटी बंडूचं तो… असे उत्तर दिले मास्तरही हादरले; वाचाल तर हसाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! दोन मित्र एकत्र आले आणि मग काय घडले ते वाचून तुम्हीही हसाल! आयुष्य सुंदर आहे त्याला आणखीन सुंदर बनवा, तुमच्या चेहऱ्यावरील हास्याने... मित्रांचे हे जोक्स वाचा आणि खळखळून हसा.
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात..
पहिला मित्र : जाऊ दे यार चल आत्महत्या करू…
दुसरा मित्र : येडा झाला का भावड्या तू..?
पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून स्टार्ट करावं लागंल….
भूगोलाचे शिक्षक पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
शिक्षक : बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू : सर, भावा-बहिणीच…
शिक्षक : कसं काय?
बंडू : हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो…
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला : हॅलो भावा काय करतोस…?
दुसरा : मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला : अरे एक काम होते. –
दुसरा : काही हरकत नाही मित्रा, आपण थोड्या वेळाने बोलू…
एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो,
हे बघ मित्र जर मी मेलो तर अजिबात नाराज होऊ नको…
अन रडू पन नको.. सरळ वरती निघून ये …
आपण पिंपळाच्या झाडावर बसून लोकांना घाबरु…
कॉलेजमध्ये पोहोचताच तो मुलगा आनंदाने उड्या मारू लागला.
मित्र : काय झालं, तू इतका आनंदी का आहेस?
मुलगा : आज पहिल्यांदाच एक मुलीगी मेट्रोमध्ये माझ्याशी बोलली…
मित्र : व्वा! भाऊ, काय बोलली मग ती?
मुलगा : मी बसलो होतो तेव्हा मुलगी म्हणाली, उठ, ही महिलांची सीट आहे…
शिक्षक : गण्या गणपतीचा अभ्यास केलास का…?
गण्या : हो मॅडम
शिक्षक : तुम्ही कुठे आहात?
गण्या : मॅडम व्हॉट्सॲपवर…
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला : हॅलो भावा काय करतोस…?
दुसरा : मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला : अरे एक काम होते. –
दुसरा : काही हरकत नाही मित्रा, आपण थोड्या वेळाने बोलू…
एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो,
हे बघ मित्र जर मी मेलो तर अजिबात नाराज होऊ नको…
अन रडू पन नको.. सरळ वरती निघून ये …
आपण पिंपळाच्या झाडावर बसून लोकांना घाबरु…
एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, यार मला एक गोष्ट फार सतावत आहे
दुसरा मित्र : कोणती गोष्ट मित्रा?
मित्र : यार हे अभ्यास करणं… नोकरी मिळवणं, लग्न करणं, ही आयडिया कोणाची होती माहीत नाही.
आरामात जंगलात राहिलो असतो… दगडं एकमेकांवर घासून आग निर्माण केली असती…
आणि झिंगालाला…! हूं…! करून मरून गेलो असतो…
Web Title: Panchat jokes teacher asked bandu what is the relationship between the earth and the moon read the funny answer to laugh out loud