नजर हटी दुर्घटना घटी! मगरीचा माकडावर जोरदार हल्ला, जीव वाचवण्यासाठी तडफडत राहिला पण शेवटी नको तेच घडले, Video Viral
प्राण्यांचे आयुष्य हे काही सोपे नाही. आपल्याला जिवंत ठेण्यासाठी काही धोकादायक प्राणी नेहमीच शिकारीच्या शोधात असतात. अशात इतर प्राण्यांना अशा काही जीवघेण्या आणि धोकादायक प्राण्यांपासून आपले प्राण वाचवायचे असते, जे फार सोपे नाही. तुमच्यावर कधी कोण हल्ला करेल ते सांगता येत नाही. अशात केलेली एक चूक देखील त्यांच्या मृत्यूचे कारण बनू शकते. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये असाच काहीसा प्रकार घडून आल्याचे दिसून आले. ज्यात माकडाचे लक्ष करताना अचानक मगर त्याच्यावर हल्ला करते आणि मग शेवटी नको तेच घडून बसते.
प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडिओज याआधीही बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. सध्या आणखीन एक व्हिडिओ यात समाविष्ट झाला आहे. यात पाण्यातील राक्षसाने म्हणजेच मगरीने एका माकडावर निशाणा साधत चपळतेने त्याला आपल्या जाळ्यात अडकावल्याचे दिसून येते. आपला जीव वाचवण्यासाठी माकड जिवाच्या आकांताने प्रयत्न करत राहतो मात्र त्याच्या या प्रयत्नांना अपयश हाथी लागते आणि मगर त्याला ओढत तलावाच्या आत घेऊन जाते. यानंतर काय झाले असेल याला विचार तुम्ही करू शकता. या थरारक शिकारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक यातील दृश्ये पाहून यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त करत आहेत.
एवढेच बघायचे बाकी होते! रीलसाठी चक्क श्वानाचे दूध पिऊ लागली तरुणी, किळसवाण्या प्रकारचा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कीमी एक मगर काठावर बसून पाणी पिणाऱ्या माकडावर निशाणा साधून असते. यावेळी माकडाला त्याच्या आजूबाजूला मगर असल्याचे समजत नाही. माकड पुढे जाऊ लागते तितक्यात मागून मगर त्याच्यावर हल्ला करते आणि काही सेकंदातच त्याला अक्षरशः ओढत तलावाच्या आत घेऊन जाते. माकड स्वत:चा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. पण मगरीने एका फटक्यात त्याला मृत्यूचा दारी पोहचवले. मगरीच्या चपळ शिकारीचा आणखीन एक थरार आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळाला. शिकारीचा हा थरार पाहून लोक थक्क झाले असून हा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
मौत आई बस दुपट्टा लेकर चली गई! भरवेगात गाडीची महिलेला धडक पण घडलं काही भलतंच, Video Viral
मगरीच्या या थरारक शिकारीचा व्हिडिओ @anytimemothernature नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अनेकांनी पाहिले असून बऱ्याच लोकांनी यावर कमेंट्स करत या शिकारीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “बाकी माकड अशी चालत आहेत जसे काही घडलेच नसावे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माकडाकडे पाळण्याची संधी होती मात्र तो पळाला नाही”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असे हे जीवन आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.