Local Train Accident : 11 हजार व्होल्टची वायर ट्रेनवर पडली, डब्यात ठिणग्या अन् धूर; दक्षिणेश्वरमधील थरारक घटना

पश्चिम बंगालमधील दक्षिणेश्वर रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनवर ११ हजार व्होल्टची ओव्हरहेड पॉवर लाईन पडल्याने ठिणग्या आणि धुराचे लोट पसरले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Local Train Accident फोटो सौजन्य सोशल मिडिया
Local Train Accident फोटो सौजन्य सोशल मिडिया Local Train Accident फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 
  • ट्रेनच्या धातूच्या बॉडीमुळे प्रवाशांचा बचाव?

  • रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

  • मोठा अपघात टळला, पण सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा गरजेची

Local Train Accident : पश्चिम बंगालमधल्या दक्षिणेश्वर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली. लोकल ट्रेनवर 11, 000 व्होल्टची ओव्हरहेड पॉवर लाईन पडल्याने ट्रेनमध्ये ठिणग्या उडाल्या आणि धुराचे लोट पसरलेले पाहण्यास मिळत आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच भितीचे वातावरण निर्माण झाली.

सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जिवित हानी आणि दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ट्रेनच्या धातूच्या बॉडीमुळे प्रवाशांचा बचाव?

ट्रेनच्या लोखंडी धातूच्या बॉडीमुळे प्रवाशांना संरक्षण मिळाले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. धातूची बॉडी विद्युत प्रवाह बाहेरील पृष्ठभागावरून वाहून नेण्यास मदत करू शकते. मात्र, यामुळे ट्रेनमधील प्रवासी नेहमीच सुरक्षित राहतात, असे मानणे चुकीचे ठरेल. ओव्हरहेड वायरचा संपर्क अत्यंत धोकादायक असून, अशा परिस्थितीत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असते.

Local Train Accident फोटो सौजन्य सोशल मिडिया
Viral Knife Attack Video : हळदी समारंभात पत्रकारावर चाकूने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

या घटनेनंतर रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असून ही ओव्हरहेड पॉवर लाईन ट्रेनवर कशी पडली? संबंधित विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करण्यात आली होती का? वायरमध्ये तांत्रिक बिघाड होता की देखभालीतील त्रुटीमुळे ही घटना घडली? या प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच स्पष्ट होऊ शकतील. मात्र या घटनांमुळे रेल्वेच्या विद्युत यंत्रणेच्या तपासणी आणि देखभालीबाबत अधिक काटेकोरपणा आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहेत.

मोठा अपघात टळला, पण सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा गरजेची

दक्षिणेश्वर रेल्वे स्थानकावरील ही घटना सुदैवाने जीवितहानीविना टळली. मात्र, प्रत्येक वेळी मोठा अपघात टळणे म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचे यश असे म्हणता येणार नाही. रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत तारांची नियमित तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि संभाव्य तांत्रिक बिघाडांची पूर्वसूचना मिळवणारी यंत्रणा अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही केवळ अपघातानंतरची मदत करण्यापुरती मर्यादित नसून, अपघात होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दक्षिणेश्वरमधील घटनेची सखोल चौकशी करून दोषी किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. कारण रेल्वे प्रवास हा सुरक्षित असावा, तो प्रवाशांच्या नशिबावर अवलंबून राहता कामा नये.

Local Train Accident फोटो सौजन्य सोशल मिडिया
viral Instagram interview : तंबूच घर, सायकलच साथीदार! आयरिश तरुण भारतातील १०० गावांना देणार भेट