Darjeeling (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @sarfiratittoo.ig नावाच्या अकाउंटवरून टाकला गेला आहे. व्हिडिओत दिसते की रस्ता खूपच अरुंद आहे आणि रस्त्याच्या अगदी बाजूलाच रेल्वेचा ट्रॅक आहे. रस्त्यावर गाड्या उभ्या आहेत आणि काही चालत आहेत.तेवढ्यात मागून दार्जिलिंगची फेमस टॉय ट्रेन येते. ट्रेन येताना पहिला कारला धक्का लागतो. त्यांनतर लगेच ती बाजूला असलेल्या एका स्कूटरला ती जोरात धडकते. धडक बसताच स्कूटरवरचे दोघेही खाली पडतात आणि स्कूटरचे पण नुकसान होते. हे सगळे बघून ट्रेनमधले प्रवासी आणि रस्त्यावरचे लोक पण घाबरतात. धडक लागल्यावर ट्रेन पण लगेच थांबते.
खरतर दार्जिलिंगमध्ये असा प्रकार नवीन नाही. तिथे डोंगराळ भाग असल्यामुळे ट्रॅक आणि रस्ता एकदम जवळ आहे. थोडी जरी गाडी ट्रॅकच्या जवळ आली तरी अपघात होण्याची शक्यता असते.
View this post on Instagram
या व्हिडिओवर लोकांनी खूपच मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “ही चूक रेल्वेच्या रुळाची आहे, रुळच खूप पुढे टाकले आहेत.”दुसरा म्हणतो, “अरे ट्रेन ड्रायव्हरने थोडे बाजूला घ्यायचे होते ना, तो सरळ का आला?”तिसरा म्हणतो, “ट्रेनने हॉर्न वाजवून बाजूने जायला पाहिजे होते.”अशा कमेंट्स वाचून हसू येते, पण यातून एक गंभीर प्रश्न पण उभा राहतो.
लोक विचारत आहेत की प्रशासन अशी वाहने ट्रॅकच्या इतक्या जवळ कशी येऊ देते? तिथे बॅरिकेट्स का नाहीत? सूचना फलक का नाहीत? जर असेच होत राहिले तर मोठा अपघात होऊ शकतो.अजून तरी या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर आली नाही. तसेच स्थानिक प्रशासनाने पण यावर काही बोलले नाही.
दार्जिलिंग टॉय ट्रेन ही खूप जुनी आहे. ती छोट्या रुळावरून धावते, त्याला नॅरो गेज म्हणतात. ती डोंगरातून, रस्त्याच्या मधून जाते म्हणूनच पर्यटकांना ती खूप आवडते. पण हेच तिचे वैशिष्ट्य आता धोक्याचे बनत आहे. रस्ता आणि ट्रॅकमध्ये जागाच नसल्यामुळे अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. आधी पण अनेक गाड्या ट्रॅकजवळ लावल्याने अपघात झाले आहेत.
त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ते अडथळे लावले पाहिजेत, जेणेकरून पुन्हा असे होणार नाही. व्हिडिओ जरी मजेशीर वाटत असला तरी सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे.






