Paris Youth in Mumbai: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुंबईत येऊन त्याला फक्त तीन आठवडे झाले आहेत, पण एवढ्या कमी दिवसात मुंबईने त्याला असे धडे दिले जे पॅरिसच्या कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला मिळाले नसते. त्याने त्याचा हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला त्यांने आपले अनुभव कॅप्शनमध्ये सांगितला आहे.
निकोल कॅप्शनमध्ये लिहितो की,
भारतीय जेवण चविष्ट असते हे मला माहीत होते, पण त्यातील वैविध्य किती प्रचंड आहे आणि दररोज काहीतरी नवीन शोधण्यात मला किती आनंद मिळेल, याची मला कल्पना नव्हती. तसेच इथला तिखटपणा सहज सहन करण्यासारखा आहे.
येथे आल्यावर माझी कोणाशीच ओळख नव्हती, पण येथील लोकांनी माझे खूप स्वागत केले आणि ते माझ्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. कामाच्या ठिकाणी असो, बाहेर फिरताना असो किंवा शहराचा शोध घेताना. नेहमीच कोणीतरी नवीन व्यक्ती भेटते.
केवळ मुंबईच इतकी विशाल वाटते की ती कधीच संपणार नाही असे वाटते. नवीन परिसर, रेस्टॉरंट्स, समुद्रकिनारे, बाजारपेठा, सण-उत्सव, वास्तुकला, नाईटलाइफ… प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मला बाहेर पडण्याचे आणि नवीन काहीतरी शोधण्याचे एक नवीन कारण मिळते.
येथे येऊन तीन आठवडे झाले आहेत आणि या नवीन प्रवासातील मला सर्वात जास्त आवडलेल्या गोष्टी कदाचित या आहेत. यात काहीच शंका नाही की, पुढे अजून खूप काही अनुभवता येणार आहे. निकोलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
निकोलच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न विचारले की, एवढे सुंदर पॅरिस सोडून तू मुंबईत का आलास?त्यावर निकोने सांगितले की मला फक्त पगारासाठी भारतात यायचे नव्हते. मला भारताची संस्कृती, इथली माणसे जवळून बघायची होती. इथे भाषा येत नाही, गर्दी, त्रास आहे, पण तरीही हे शहर जितका त्रास देते त्यापेक्षा जास्त प्रेम पण देते. सुरुवातीला त्याला या शहराची भीती वाटत होती, पण आता हेच शहर त्याला आपले वाटायला लागले. आता तो पूर्णपणे मुंबईकर होऊन या शहराच्या गर्दीत मिसळून गेला आहे. निकोची ही स्टोरी अनेकांना आपलीच वाटते, कारण जो कोणी बाहेरून मुंबईत येतो त्याचा अनुभव असाच असतो.






