सध्याच्या युगात सर्वजण कामात बुडून गेले आहेत. अनेकदा हे कामाचे प्रेशर इतके वाढते की लोक आपला जीव संपवण्याचा प्रयत्न करतात. मागील काही काळापासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यात लोकांनी कामाला कंटाळत आपला जीव संपवून टाकला. कॉर्पोरेट संस्थांमध्ये वर्क कल्चरबाबत अनेकदा चर्चा होत असते. इथे कर्मचाऱ्यांकडून कसून काम करून घेतले जाते. अनेकदा कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण इतका वाढतो की माणुसकीचीही लाज वाटू लागते. सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपला अपघात झाला असे सांगिल्यास बॉसने सहानभूती न दाखवता कर्मचाऱ्याला असा काही मेसेज केला की पाहून आता तुमचाही संताप होईल. बॉस आणि कर्मचाऱ्यातील संवाद आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. झाले असे की, कर्मचाऱ्याच्या गाडीचा गंभीर अपघात झाल्याने त्याला ऑफिसला वेळेवर जाता आले नाही उशीर होऊ लागल्यावर त्याने त्याच्या तुटलेल्या कारचा फोटो त्याच्या बॉसला पाठवला. मात्र, बॉसने त्याला दिलेले उत्तर पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मॅनेजरने चिंता व्यक्त करण्याऐवजी कर्मचाऱ्याला स्वतःबद्दलचे अपडेट्स देत राहण्यास सांगितले.
हेदेखील वाचा – Viral Video: काळ आला की मृत्यू अटळ आहे! पाहा वेळ आली माणूस कसा जाळ्यात अडकतो
बॉसने काय म्हटले?
आपला अपघात झाल्याचे सांगताच बॉसने म्हटले, “तुम्ही ऑफिसला किती वाजता पोहोचता, त्याचे अपडेट मला देत राहा. दिवसभरानंतरही प्रतिसाद न आल्याने मॅनेजरने दुसरा संदेश पाठवला. ज्यात त्यांनी लिहिले – तुम्हाला उशीर का झाला हे समजण्यासारखे आहे, परंतु जर तुम्ही कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यू तर झाला नाही ना? तसं असेल तरंच सुट्टी मिळेल, त्यामुळे ऑफिसला आलात नाही, तर कंपनी तुम्हाला माफ करणार नाही.” आपली काळजी करण्याऐवजी असे काही उत्तर दिलेले पाहून कर्मचारीही थक्क झाला असावा. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली.
what would y’all respond with if your manager says this? pic.twitter.com/bZznlPZrLT
— kira 👾 (@kirawontmiss) October 22, 2024
हेदेखील वाचा – व्यक्ती 12व्या मजल्यावरून उडी मारून देत होता जीव तितक्यात लोक आले अन्… धडकी भरवणारा Video Viral
ही व्हायरल पोस्ट @kirawontmiss नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, ‘तुमच्या मॅनेजरने असे म्हटले तर तुम्ही काय उत्तर द्याल?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरेने लिहिले, “अशा मॅनेजरची मला भीती वाटते , जणू खरंच तुमचे आयुष्य इतके दयनीय आहे का?! तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी माझ्या मॅनेजरला सांगितले की मला कोविड झाला आहे आणि त्याला माझ्यावर विश्वास बसला नाही” आणखीन एका युजरने लिहिले, “मी असा जॉब सोडून देईन”.