सोशल मीडियावरील अनेक व्हायरल व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवतील. हे जग अनेक चांगल्या वाईट गोष्टींनी भरलेले आहे. यात काही लोक ताकदीने जगतात तर काही यात आपली हार मानतात. व्हायरल व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती चक्क सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारून आपला जीव संपवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. व्हिडिओतील थरारक दृश्ये आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत, जी पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत. माहितीनुसार, घटना नोएडातील एका पॉश सोसायटीतील आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, नोएडातील सुपरटेक केप टाऊन सोसायटीच्या 12 व्या मजल्यावर एक व्यक्ती आपल्या मृत्यूची वाट पाहत असल्याचे दिसून येते. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला एक व्यक्ती सोसायटीच्या 12 व्या मजल्यावरील टोकाशी उभा राहत असल्याचे दिसते. यावेळी या व्यक्तीने आपले संपूर्ण शरीर त्या मजल्याच्या बाहेर काढले असून तो फक्त आपल्या हाताचा आधार घेत तिथे थांबला होता. व्यक्ती आपला हाथ सोडत आपला जीव संपवण्याच्या विचारात होता मात्र तितक्यात भलतेच घडून बसते.
हेदेखील वाचा – ऐकावं ते नवलंच! जोडप्याने चक्क समुद्राखाली आटोपले लग्न, Viral Photo पाहून तुम्हीही व्हाल थक्क
व्हिडिओमध्ये दिसणारे हे भयानक दृश्य समोरच्या अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आहे आणि जवळच्या लोकांना जाऊन मदत करण्यास सांगत आहे. सुरुवातीला सदर व्यक्तीने जीव संपवण्याच्या उद्देशाने इमारतीला लटकून घेतल्याचे समजते मात्र त्याचे परिणाम वाईट होणार असल्याचे समजल्याने तो हवेत लटकून मदतीची वाट पाहू लागला. यावेळी हा व्यक्ती मृत्यू आणि जीवन यांच्यात संघर्ष करताना दिसून आला. त्याची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. यानंतर सोसायटीतील काही सदस्यांनी पळत येऊन या व्यक्तीला खेचत त्याचे प्राण वाचवले. या व्यक्तीला कशाचा तरी ताण आला त्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेजाऱ्यांच्या बुद्धीमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले.
A man tried to jump from the 12th floor in Supertech Capetown Society in Noida, UP. Some people reached just in the nick of time and saved him
pic.twitter.com/RcHexuxDUE— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 21, 2024
हेदेखील वाचा – धक्कादायक! विषारी सापाने चिमुकलीच्या गळ्याभोवती घातला विळखा अन् क्षणार्धात… Video Viral
मृत्यूच्या या थरारक घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सुपरटेक केपटाऊन सोसायटीमध्ये एका व्यक्तीने 12व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. काही लोक वेळेत पोहोचले आणि त्यांनी त्याला वाचवले’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे.
एका युजरने लिहिले आहे,”दात घासताना भाऊने त्या माणसाचा जीव वाचवला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या व्यक्तीने हा स्टंट फक्त लक्ष वेधण्यासाठी असे केले आहे”. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये व्यक्तीने आपला जॉब गमावल्याने जीव देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.