• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Foreigners Taste Paan Masala First Time Reactions Viral

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

Karl Rock Viral Video : न्यूझीलंडचा युट्यूबर कार्ल रॉकने रजनीगंधा पान मसाला जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये कार्ल पहिल्यांदाच त्याच्या परदेशी मित्रांना पान मसाला खाऊ घालताना दिसत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 21, 2025 | 04:19 PM
Foreigners taste Paan Masala first time reactions viral

karl rock viral video : परदेशी मित्रांना कार्लने दिला 'पान मसाला', मजेशीर हावभाव पाहून नेटिझन्स लोटपोट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Karl Rock Viral Video : भारतातील “पान मसाला” हा शब्द ऐकताच डोक्यात जीभेवर रेंगाळणारी गोडसर चव, मसाल्याचा तिखटपणा, थोडा मिंटी फ्रेशनिंग आणि त्यासोबत भारतीय संस्कृतीची छटा उभी राहते. भारताच्या रस्त्यांवर, चौकाचौकात, गल्लोगल्ली हा पान मसाला सहज दिसतो. पण हा भारतीय चविष्ट पदार्थ जेव्हा परदेशी लोकांच्या जिभेवर पोहोचतो, तेव्हा काय होते? हाच अनुभव सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडचा प्रसिद्ध युट्यूबर कार्ल रॉक याने आपल्या परदेशी मित्रांना पहिल्यांदाच भारतातील प्रसिद्ध “रजनीगंधा पान मसाला” चाखायला दिला आणि त्यांचे अनुभव कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर २१ जुलै रोजी अपलोड करण्यात आला असून, आतापर्यंत तब्बल ५.५ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून धमाल उडवत आहे.

कार्ल रॉकने दिला पहिला घास

व्हिडिओमध्ये कार्ल रॉक आपल्या मित्रांना पान मसाला खाण्याची “योग्य पद्धत” शिकवताना दिसतो. तो त्यांना सांगतो  “हे गिळायचं नाही, फक्त चोखायचं.” पण पान मसाला जिभेवर पडताच परदेशी मित्रांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून जातात. काहींचे डोळे मोठे झाले, काहींनी आश्चर्यचकित चेहऱ्याने एकमेकांकडे पाहिले, तर काहींना ते अगदी सहनही झाले नाही.

हे देखील वाचा : Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव

परदेशी मित्रांच्या भन्नाट प्रतिक्रिया

एका मित्राने थेट उद्गार काढले – “कोणी हे तोंडात का घालेल?”

दुसऱ्याने मात्र थोडा सकारात्मक सूर लावला – “यात थोडासा पुदिन्याचा फ्लेवर आहे.”

तर आणखी एका मित्राने ते ब्रेथ फ्रेशनर म्हणून वापरता येईल, असा सल्ला दिला. पण काही वेळातच त्याचे तोंड लालसर होऊ लागले आणि त्याला हा प्रयोग फारसा रुचला नाही. सर्वात मजेदार प्रतिक्रिया काळ्या टी-शर्टमधील मित्राने दिली. तो कार्लकडे नाट्यमय अंदाजात पाहत म्हणाला “आपल्या आयुष्यात अशी अनोखी चव फक्त तूच आणू शकतोस!” पण काही सेकंदांतच त्याने हात टेकले आणि म्हणाला  “माफ कर भाऊ, हा माझा चहाचा कप नाही.”

View this post on Instagram

A post shared by Karl Rock (@iamkarlrock)

Pic credit : social media and Instagram

शेवट अधिक मजेदार!

व्हिडिओच्या शेवटी कार्लने पान मसाला “माउथ फ्रेशनर” आहे म्हणून समजावून सांगितले. त्यावर त्याचा एक मित्र हसतच म्हणाला  “नाही रे, अजिबात नाही. मला तरी काही फ्रेशनिंग वाटलं नाही!”

प्रेक्षकांच्या भन्नाट कमेंट्स

हा व्हिडिओ जसजसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे, तसतशा त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पूर आला आहे.

1. एका वापरकर्त्याने मजेदार इशारा दिला – “कार्ल भाऊ, काळजी घ्या! उद्या तुमचे मित्र तेच पॅकेट मागतील.”
2. दुसऱ्याने विनोद केला – “पुढच्या वेळी तंबाखूही खाऊ घालणार का?”
3. आणखी एकाने गंमतीदार तुलना केली – “बंदर क्या जाने अदरक का स्वाद तसं झालंय!”
4. तर कुणीतरी म्हणालं – “आता बोला, जुबान केसरी!”

भारतीय संस्कृतीचा अनोखा रंग

या व्हिडिओमुळे एक गोष्ट मात्र खरी ठरते भारतीय पदार्थ, मग तो पान मसाला असो, मसालेदार स्ट्रीट फूड असो किंवा चहाचा कप, हे परदेशी लोकांसाठी नेहमीच एक साहसी अनुभव ठरतो. भारताची खाद्यसंस्कृती जशी विविधतेने नटलेली आहे, तशीच तिची चवही अनेकांना थक्क करून जाते. कार्ल रॉकसारखे युट्यूबर जेव्हा भारतीय चव जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवतात, तेव्हा भारताची “मसालेदार ओळख” अजूनच जागतिक पातळीवर ठळकपणे समोर येते.

हे देखील वाचा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे

सोशल मीडियावर गाजणारा हा व्हिडिओ

सोशल मीडियावर गाजणारा हा व्हिडिओ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर तो भारताच्या “पान मसाला संस्कृतीची” झलकही दाखवतो. परदेशी लोकांना ते आवडो वा न आवडो, पण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या मजेदार प्रतिक्रिया पाहून भारतीय प्रेक्षक मात्र नक्कीच हसून लोटपोट झाले आहेत.

Web Title: Foreigners taste paan masala first time reactions viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • New Zealand
  • Paan Masala
  • Video Viral
  • viral video

संबंधित बातम्या

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल
1

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral
2

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral

भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral
3

भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video
4

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

Jan 09, 2026 | 01:15 AM
Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Jan 08, 2026 | 11:23 PM
Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग

Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग

Jan 08, 2026 | 10:24 PM
Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Jan 08, 2026 | 10:15 PM
नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

Jan 08, 2026 | 09:39 PM
पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Jan 08, 2026 | 09:38 PM
सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

Jan 08, 2026 | 09:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.