भारतातील एक असे रेल्वे स्थानक जिथे आहे भुतांचे अस्तित्व
रेल्वे स्टेशनशी संबंधित अनेक भुतांच्या कथा तुम्ही ऐकल्या असाव्यात. भुतांच्या कथा पुस्तकात किंवा चित्रपटात बहुदा पाहायला मिळतात. जगात अनेक वेगवगेळ्या विचारसरणीचे लोक राहतात. यातील काही लोकांचा आजही भुतांवर विश्वास आहे तर काही आजही अशा सर्व गोष्टी काल्पनिक असल्याचा दावा करताना दिसतात. प्राचीन वास्तू आल्या की, भुतांच्या रहस्यमयी गोष्टी समोर येतात. असे म्हणतात की, वास्तू जितकी जुनी असती तितकीच ती रहस्याने भरलेली असते. या भुताटकीच्या कहाण्या खऱ्या की खोट्या हे तर आजवर कोणी शोधू शकले नाही मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या रेल्वे स्थानकाविषयी सांगत आहोत, इथे प्रत्यक्षात भुतांचे वास्तव पाहण्यात आले आहे. या स्टेशनचे नाव ऐकताच आजही लोकांचा थरकाप होऊ लागतो.
आम्ही तुम्हाला ज्या भुतिया रेल्वे स्थानकाविषयी सांगत आहोत, ते रेल्वे स्थानक रांचीमध्ये स्थित आहे आणि याचे नाव आहे बेगुनकुदर. लोकांचे म्हणणे आहे की इथे ट्रेनसोबत भूतांची शर्यत होते. एवढेच काय तर, या जागी होणाऱ्या रहस्यमयी घटनांमुळे एकेकाळी लोकांनी या स्टेशनवर काम करण्यासही नकार दिला होता. रांचीपासून 90 किलोमीटर अंतरावर हे रेल्वे स्थानक आहे. हे स्टेशन झाल्डा आणि कोटशिला दरम्यान आहे, जे राणी लचेन कुमारीने 1960 मध्ये बांधले होते. पण लोकांमध्ये स्टेशनची इतकी भीती होती की लोको पायलटनेही याजागी ट्रेन थांबवत नाहीत. सर्व भुताटकीच्या कथा आणि घटना पाहता रेल्वे विभागाने हे स्थानक बंद केले आहे.
हेदेखील वाचा – विचित्र परंपरा: भारतातील ‘या’ राज्यात मृत्यू झाला तर आनंद अन् बाळ झालं तर शोक व्यक्त केला जातो
या रेल्वे स्थानकाच्या रुळांवर लोकांना आत्मांचे भयानक दृश्ये दिसायची. 2009 मध्ये हे रेल्वे स्थानक पुन्हा एकदा सुरू करण्यात आले, परंतु परिस्थिती जशीच्या तशीच राहिली. 1967 मध्ये येथे एका रेल्वे कामगाराचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासून तो या ठिकाणी भूत म्हणून फिरत असल्याचे सांगण्यात येते. ट्रेन येताच भूत रुळांवर नाचू लागते आणि वर-खाली उड्या मारू लागते.
या स्थानकावर एका स्टेशन मास्टरचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. अचानक एकेदिवशी, मास्टर त्याच्या क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यामागे भुताचा हाथ असल्याचे तेथील स्थानिकांचे मत आहे. यानंतर भुतांच्या भीतीने हे रेल्वे स्टेशन अवघे 42 वर्षे बंद करण्यात आले होते. स्थानकाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये हे स्थानक एक गूढ बनून राहिले आहे. दरम्यान भारतात इतरही भयानक रेल्वे स्थानक आहेत. जसे की, नैनी रेल्वे स्टेशन, चित्तूर रेल्वे स्टेशन आणि बरोग रेल्वे स्टेशन प्रमाणे. या स्थानकाशी संबंधित काही भुताटकीची कथा आजही लोकांच्या तोंडच पाणी पळवतात.