जगभरात अनेक वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्मात वेगळी परंपरा लोकांद्वारे पाळली जाते. मात्र यातील काही परंपरा इतक्या विचित्र असतात की, ज्यांचा आपण स्वप्नातही कधी विचार केला नसावा. आज आम्ही तुम्हाला अशाच एक विचित्र परंपरेविषयी माहिती सांगत आहोत. याबाबत ऐकून तुम्ही अचंबित व्हाल आणि तुम्हाला यावर विश्वासच बसणार नाही. आज आम्ही अशाच एका जमातीबद्दल सांगणार आहोत, जी जीवन पद्धतीच्या एकदम उलट काम करते.
वास्तविक पाहता लोक आपल्या घरी कोणा नव्या चिमुकल्याचा जन्म झाला तर आनंद साजरा करतात. काही जण तर आनंदात सर्वांना मिठाई वाटत फिरतात. तसेच आपल्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्याविषयी शोक व्यक्त केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात अशी एक जमात आहे, जिथे चक्क मूल जन्माला आलं की लोक दुःखी होतात आणि कोणाचा मृत्यू झाला की लोक आनंद साजरा करतात. आता ही जगावेगळी परंपरा ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असावा मात्र असे याजागी नक्की का केले जाते? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – चीनमध्ये केली जाते मराठी माणसाची पूजा! राष्ट्रपतीही झुकवतात मान, नक्की कोण आहे हा व्यक्ती? जाणून घ्या
राजस्थानमधील जिप्सी समाजात या विचित्र परंपरेचे पालन केले जाते. राजस्थानमध्ये सुमारे 24 जिप्सी कुटुंब गट आहेत. ते किनाऱ्यावरील निवारा आणि सतीया समाजाच्या रिकाम्या जागेत राहतात. या जमातीतील बहुतांश लोक निरक्षर आहेत. या समुदायात लोक एखाद्याच्या मृत्यूचा आनंद साजरा करतात तर नवीन मुलाच्या जन्मावर शोक व्यक्त करतात.
अशा परिस्थितीत जेव्हा या जमातीतील कोणी मरण पावते तेव्हा सर्वजण नवीन कपडे घालतात, मिठाई देतात आणि दारूचे सेवन करतात. जिप्सी जमातीमध्ये जर कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह मिरवणुकीत काढला जातो, ढोलाच्या तालावर लोक नाचतात आणि गाणी गातात. एवढेच काय तर, मृत व्यतीच्या शवाची राख होईपर्यंत लोक नृत्य करत राहतात. जेव्हा या मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार पूर्ण होतात, त्यांनतर उर्वरित जमातीसाठी मेजवानीचे आयोजन केले जाते आणि मोठ्या थाटामाटात हा दिवस साजरा केला जातो.
यामागचे कारण बघता, या जमातीच्या लोकांचा असा विश्वास आहे की मृत्यू ही आपल्यासाठी एक उत्तम संधी आहे कारण ती आत्म्याला भौतिक स्वरूपातून मुक्त करते. वास्तविक ही जमात मानते की, जीवन हा एक शाप आहे, जो देवाने आपल्याला शिक्षा म्हणून दिला आहे. म्हणूनच या जमातीमध्ये कोणत्या घरात लहान मूळ जन्माला आले की, दुखवडे साजरे केले जातात. या प्रसंगी सर्वजण त्या मुलाला शिव्या देतात, त्या दिवशी घरात अन्न शिजवले जात नाही.
या जमातीची मुले ना शाळेत जातात ना अभ्यास करतात. या समाजातील स्त्रियांचा रंग गडद तपकिरी असतो. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या समाजातील महिला वेश्याव्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात आणि आपले कुटुंब चालवतात.