बाईईईईई... काय हा प्रकार? तरुणीने स्किनकेअरसाठी अंगाला गुंडाळली काकडीची साल, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की ब्युटी इन्फुएन्सरने चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काकडी वापरण्याची आयडिया दिली आहे. परंतु तिने ज्या पद्धतीने काकडी शरीराला गुंडाळली आहे पाहून लोक हसत आहेत.त मुलीने एका काकडीच्या सीलाला आपल्या शरीरावर गुंडाळून घेतले आहे. चेहऱ्यावर, मानेवर तिने काकडी सोलून लावली आहे. सहसा लोक काकडीचे गोल काप करुन डोळ्यांखालचे काळे कमी करण्यासाठी वापरतात. परंतु या तरुणीने संपूर्ण शरीरावर ज्या प्रकारे काकडी लावली पाहून सर्वजण थक्क झाले आहे. यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
A post shared by Tannu | skincare guide | beauty | lifestyle | ugc creator (@dewy.skin.tannu)
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @dewy.skin.tannu’s या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने मॅडम तुम्ही कोणत्या प्लॅनेटवरुन आहात असा प्रश्न केला आहे तर दुसऱ्या एकाने माझ्या घरी बटाट्याटी साल आहे चालेल का असे विचारले आहे. तर तिसऱ्या एकाने The Mummy Returns ची शूटिंग सुरु आहे का असे विचारले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






