युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर, तर काही व्हिडिओ पाहून काळाजाचा ठोकाच चुकतो. सध्या असाच एक युद्धाचे भीषण वास्तव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे गाझातील भायनक वास्तव या व्हिडिओत दिसत आहे. यामध्ये काही चिमुकल्या एका बाहुलीची अत्यंत यात्रा काढताना दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहून संपूर्ण जग हळहळले आहे. या दृश्यावरुन स्पष्ट होते की युद्धाचा मुलांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होऊ शकतो. खेळण्याच्या वयात संघर्षाच्या सावटाखाली त्यांचे बालपण हिरावले जाते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की ५ मुली बाहुलीची अंत्ययात्रा काढत आहेत. गाझातील विस्थापन शिबिरात या मुली खेळताना दिसत आहे. त्यांनी एका लहान स्ट्रेचरवर बाहुलीला झोपवले असून तिला उचलून घेतले आहे. यातून युद्धाचे भयानक वास्त स्पष्टपणे दिसत आहे. निरागस खेळत्या वयात शोक करणे हा या चिमुकल्यांचा खेळाचा भाग बनला आहे.
गाझातील लोकांची घरे उद्ध्वस्त झाल्याने चिमुकल्यांना झोपडपट्ट्यांमध्ये राहायला लागत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजांसाठी झटावे लागत आहे. चिमुकल्यांकडे खेळायला ना कार, ना भांडीकुंडी आहेत. युद्धामुळे सतत लोकांचे प्राण जात असून अंत्यसंस्कार या चिमुकल्यांचा जीवनाचा भाग बनला आहे. आणि म्हणतात ना मुलं जे पाहतात, ऐकतात तेच शिकतात. त्यांच्या समोरील दृश्यातून हा अंत्ययात्रेचा खेळ सुरु झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ
Gaza children hold funerals for dolls reflecting a generation shaped by war. | #GazaGenocide pic.twitter.com/Dcdrd19WJe — Ika Ferrer Gotić (@IkaFerrerGotic) March 30, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
ही दृश्ये अतिशय वेदनादायी आहेत. युनिसेफच्या मते गाझा पट्टीतील मुले आणि कुटंबांसाठी दैनंदिन जीवन अत्यंत कठणी बनले आहे. चिमुकल्यांचेच नव्हे तर मोठ्या लोकांचेही मानसिक आरोग्य धोक्यात आहे. कुपोषणाचा सामना येथील मुलांना करावा लागत आहे. ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर सुरु झालेल्या या युद्धाने भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळाजाचा ठोका चुकला आहे. सोशल मीडियावर लोक युद्धबंदीची मागणी करत आहे. मात्र सध्या जागतिक पातळीवर अमेरिका इराण, रशिया युक्रेन, इस्रायल-लेबनॉन अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्ध सुरु आहे. परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






