सैदापूर राहण्यास असलेल्या विद्या पिसाळ दिवाळीसाठी मुळगावी चोराडे, ता. कराड येथे गेल्या होत्या. तेथून पुसेसावळी येथून दहिवडी -कराड एसटी बसमधून त्या कराडला येत होत्या.
पुणे-नाशिक महामार्गावरील तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे ऋषी पेट्रोल पंपावर शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दरोड्याची घटना घडली आहे.
गाळा मालक शामराव रावजी बाबर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करून चोर जात असताना आशिष होगाडे यांना आवाज आल्याने ते तिकडे गेले. त्यावेळी सुमारे आठ चोरटे चोरी करताना दिसले.
माळेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत मिनीबस चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणला. विशेष म्हणजे चोरीच्या या प्रकारामागे मिनीबसचाच चालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहीद चौकाजवळील मोदी राखी भंडारजवळ त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली. या दरम्यान दुचाकीवर असलेले तिन्ही आरोपी त्यांच्या मदतीला आले. त्यांनी पिशवी उचलून शाकेरा यांच्याकडे दिली आणि निघून गेले.
Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 26 - 08- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...
सिंहगड रस्त्यावरील सोसायटीतील फ्लॅट फोडून साडे आठ लाखांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणात सुरक्षा रक्षकच चोरटा निघाला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
ग्लॅमरस स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री खुशी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खुशी मुखर्जीच्या घरातून २५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. खुशीने तिच्या घरातील नोकरावर चोरीचा संशय व्यक्त…
घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या कपाटातून चोरट्यांनी रोख चोरून नेली त्याच कपाटात सोन्याचे दागिनेही होते, पण ते त्याच्या नजरेतून सुटले.
कुणाल तरोणे (रा.नवेगावबांध) यांचे नवेगावबांध येथील बसस्थानकाजवळ गुरुकृपा मोबाईल शॉपी नामक दुकान आहे. त्यांच्या दुकानातील अँड्राईड मोबाईल आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगस्टच्या रात्री चोरून नेले होते.
रेल्वे प्रवासी महिलेला मदतीचा बहाणा करून तिच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या, अंगठी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.
आंबेडकर भवनच्या इमारतीच्या डाव्या बाजूला अंधारात पाच ते सहा व्यक्ती त्यांच्याकडे धारदार शस्त्र बाळगून ते कुठेतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र बसले असल्याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली.
चोरट्यांनी साडेतीन वर्षात पुणे शहरातील २ हजार बंद घरे फोडत तब्बल ७३ कोटींचा ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यात पोलिसांना यश आले…
बावधन परिसरातील एक ज्येष्ठ महिलेने पीएमटी तसेच रिक्षा प्रवास सुरू केल्यानंतर या प्रवासात त्यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने तब्बल ११ लाखांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोपींचा मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी शोध घेऊन चौघांना अटक केली. आरोपींनी चोरी केलेले सर्व साहित्य मुंबई येथे ठेवले होते. सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.