Little Tukaram Mundhe Goes Viral (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पण आता त्यांची ही चर्चा फक्त ऑफिसपुरती किंवा बातम्यांपुरती राहिली नाही. त्यांची क्रेझ थेट नवरात्रीच्या गरब्याच्या मैदानात पोहोचली आहे. यंदाच्या नवरात्रीत फॅन्सी ड्रेस गरबा स्पर्धेत लहान लहान मुलं तुकाराम मुंढे बनून येत आहेत आणि त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
व्हिडीओत काय दिसतं तर एक छोटा मुलगा एकदम मुंढे साहेबांसारखा तयार झाला आहे. अंगात फॉर्मल शर्ट-पँट, नाकाखाली छोटी मिशी, डोळ्यावर चष्मा, गळ्यात आयडी कार्ड आणि हातात एक फाईल. एका मुलाच्या हातात तर एक पाटी पण आहे, त्यावर लिहिलं आहे “मी छोटा तुकाराम मुंढे आहे” आणि खाली एक वाक्य लिहिलं आहे “Honesty is the best policy” म्हणजे प्रामाणिकपणा हाच खरा दागिना आहे.
अशा वेशात ही मुलं जेव्हा गरब्याच्या स्टेजवर येतात तेव्हा लोक टाळ्या, शिट्ट्या वाजवून त्यांचं स्वागत करतात. लहान मुलं असा विचार करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. सहसा मुलं जेठालाल, सिंघम, झाशीची राणी असे काहीतरी बनतात, पण यावेळी एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा लूक घेऊन येणं हे खरंच वेगळं आहे.
View this post on Instagram
सरकारी अधिकारी म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर भ्रष्टाचार येतो. पण तुकाराम मुंढे यांचं नाव याला अपवाद आहे. ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. आजपर्यंत त्यांच्या अनेकदा बदल्या झाल्या, पण ते ज्या ठिकाणी गेले तिथे त्यांनी आपल्या कामाने छाप सोडली.
नियमात कोणतीही तडजोड नाही, कामात पारदर्शकता आणि लोकांच्या हिताला पहिलं प्राधान्य, यामुळे सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. म्हणूनच जेव्हा लहान मुलं त्यांचा अवतार घेतात तेव्हा लोकांना ते खूप भारी वाटतं. 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत.
View this post on Instagram
या व्हिडीओवर लोक खूप भारी कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, sahnavaidya म्हणतो की “शेवटी लोकांनी योग्य माणसाला आदर्श मानायला सुरुवात केली आहे.”
दुसरी युजर pranita_thakur26 म्हणते की “बाळा खूप छान केलंस, तुकाराम सर लवकरच तुला भेटायला येतील.” तर nehasalviofficial ने गंमतीत लिहिलं आहे की “मुंढे साहेब लवकरच तुझ्या आईच्या किचनला भेट देतील” कारण सध्या ते घरातल्या भेसळीवर पण लक्ष देत आहेत.
अनेकांनी हसण्याचे इमोजी टाकून या मुलांचं कौतुक केलं आहे. खरंच, अशा छोट्या गोष्टींमधूनच आपण मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवू शकतो. एखाद्या हिरोचा नाही तर एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा आदर्श घेणं, हीच खरी नवरात्रीची शिकवण आहे असं म्हणायला हरकत नाही.
Ans: तुकाराम मुंढे यांचा
Ans: फॉर्मल कपडे, चष्मा, छोटी मिशी, आयडी कार्ड आणि हातात फाईल.
Ans: ‘मी छोटा तुकाराम मुंढे आहे’ आणि ‘Honesty is the best policy’.






