दगडाच्या आत दडला होता अद्भुत इजिप्शियन खजिना, पाहून लोक थक्क, Viral Video पाहिलात का?
हे जग अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आपण ज्याप्रमाणे जगाकडे पाहतो त्याहून कितीतरी पटींनी हे जग वेगळे आणि मोठे आहे. तुम्ही अनेकदा रहस्यमयी गोष्टी किंवा प्राचीन खजिन्याविषयी ऐकले असेल. तुम्ही दफन केलेल्या किंवा लपवलेल्या पैशाबद्दल देखील ऐकले असेल. वडिलधारी लोक सांगत असत की, जुन्या काळी लोक आपली मौल्यवान वस्तू कोणी चोरू नये म्हणून जमिनीखाली गाडून ठेवत असत. बऱ्याचदा जमीन खोदताना अशा वस्तू सापडतात ज्यात खजिना भरलेला असतो. जगातील अनेक लोक खजिन्याच्या शोधात आहेत. अशाच एका व्यक्तीच्या हाती एक खास प्रकारचा इजिप्शियन खजिना आला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. विशेषत: कष्ट न करता एखादी मौल्यवान वस्तू मिळाली तर ते नशीब मानले जाते. या खजिन्याच्या शिकाऱ्याचेही नशीब चांगले होते, जे त्याच्या मेटल डिटेक्टरने चमत्कार केला आणि त्याला दगडात लपवलेला सोन्याचा खजिना सापडला. वर्षानुवर्षे हा खजिना जमिनीखाली गाडलेला होता.
हेदेखील वाचा – धक्कादायक! नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती धुळीने माखलेला दगड घेऊन त्यावर पाणी टाकत असल्याचे दिसून येते. या दगडाला आणखीन कोणत्या तरी गोष्टीने सील करण्यात आले होते. त्यावर काही द्रव टाकून ते काढले जात आहे. समोरचा दगड काढल्यावर आतून सोन्याच्या पुतळ्यासारखी पेटी बाहेर येते. पेटी उघडताच आतून दुसरी भक्कम मूर्ती बाहेर येते. ही मूर्ती बरीच प्राचीन आणि भक्कम दिसते. ही मूर्ती पाहून ती इजिप्तची असल्याचे वाटते कारण इजिप्तच्या इतिहासात अशा काही मुर्त्यांची उल्लेख आहे. बाजारात याची किंमत गगनाला भिडण्याएवढी असावी.
हेदेखील वाचा – ट्रक आडवा आला अन् अचानक सर्व दुचाकी रस्त्यावर जोरदार आपटल्या, Viral Video पाहून अंगावर काटा येईल
हा व्हिडिओ @treasures_x_hunter नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5.6 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर 1 कोटींहून अधिक लोकांनी त्याला लाइकही केले आहे. यावर लोकांनी केलेल्या कमेंट्समध्ये काहींनी याला खोटं म्हटलं तर काहींनी म्हटलं की, अशा गोष्टी मिळवणारा तो भाग्यवान माणूस आहे.