आईच काळीज इतक धाडस करू शकत! मृत्यूच्या विळख्यात अडकलेल्या मुलीचे आईने वाचवले प्राण, थरारक Video Viral
समुद्राला कधीही हलक्यात घेऊ नये, कारण समुद्राचे पाणी इतके अनपेक्षित असत की याच्या लाटा कधी तुम्हाला ओढून घेऊन जातील तुम्हाला समजणार देखील नाही. समुद्र ठिकाणी गेल्यावर नेहमी सावध राहण्याचा आणि आपल्या जीवाची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. अहो, आजवर कित्येक मोठमोठ्या बोटदेखील समुद्राने आपल्यात सामावून घेतल्या आहेत. त्यामुळेच समुद्र ठिकाणी गेल्यावर कधीही निष्काळजीपणा करू नये अन्यथा हे आपल्या जीवावर बेतू शकते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घडते असे की, समुद्राची मजा लुटण्यासाठी एक मुलगी आपल्या आईसोबत एका समुद्र ठिकाणी गेली. यावेळी त्या समुद्रालगत किनाऱ्यावर वातावरणाचा आनंद लुटत होत्या, मात्र त्यांचा हा आनंद काही काळापुरताच मर्यादित राहतो आणि पुढच्याच क्षणी समुद्र आपल्या थरारक गेम खेळतो. पुढच्याच क्षणी समुद्राच्या भल्यामोठ्या लाटा वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि आई-मुलीला आपल्याकडे खेचतात. दरम्यान आईला किनाऱ्यावर येण्याची संधी मिळाली पण तिची मुलगी मात्र पाण्यात वाहून जात होती, जणू मृत्यू तिला आपल्याकडे खेचतच होता.
हेदेखील वाचा – … म्हणूनच ती गौमाता! जखमी बिबट्याला गायीने केली मदत, कधीही न पाहिलेले दृश्य, Video Viral
आईला जगाचे दैवत मानले जाते. सर्वांची काळजी घेणारी ही आई वेळ आल्यावर रौद्र रूप देखील धारण करू शकते. व्हायरल व्हिडिओत देखील पुढे असेच काहीसे घडते. आपल्या मुलीला समुद्र आपल्याकडे खेचत असल्याचे पाहून ती प्रसंगावधान दाखवते आणि त्वरित पुढे जाऊन आपल्या मुलीला खेचत बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. सुदैवानं शेवटी एक भलीमोठी लाट किनाऱ्यावर आली आणि त्यासोबत या मायलेकी अखेर किनाऱ्यावर येतात. यानंतर इतर लोकही पुढे येत त्यांची मदत करू लागतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडिओतील दृश्ये अनेकांना अंगावर काटा आणत आहेत.
हेदेखील वाचा – काय खरं काय खोटं? महिलेने साडीला लावली आग अन् पुढच्याच क्षणी… अंगावर काटा आणणारा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @viralinmaharashtra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘ओएमजी’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून बऱ्याच लोकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काय गरज होती जवळ बसायची, मेंदू गुडग्यात हाय काय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आईच काळीज इतक धाडस करू शकत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.