
माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral
बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रहिवासी संजय विश्वकर्मा हे एका चमत्कारापेक्षा कमी नाहीत. वयाच्या १२ व्या वर्षी पान खाताना त्यांनी दातांमध्ये अडकलेली सुपारी काढण्यासाठी पिन वापरण्यास सुरुवात केली आणि हळूहळू ती सवय झाली. वर्षानुवर्षे पिनची संख्या वाढतच गेली. गेल्या ४५ वर्षांपासून ते तोंडात धारदार लोखंडी आणि पितळी पिना घेऊन फिरत आहेत. सामान्य माणसाच्या तोंडात एक छोटीशी पिन अडकली तरी त्याचा जीव कासावीस होईल पण इथे तर संजय खाताना, पिताना एवढंच काय तर झोपतानाही आपल्या तोंडात दोकदार पिना ठेवत एक आरामदायी आयुष्य जगत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पिन असूनही, त्याच्या तोंडात कोणतेही व्रण किंवा दुखापत नाही.
संजयचा हा छंद वैद्यकीय शास्त्रासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्याने इतक्या वर्षात शेकडो लोखंडी पिनांचा संग्रह साठवून ठेवला आहे. त्याची ही कहाणी आता सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत असून लोक ही पोस्ट वेगाने शेअर करत आहेत. इंस्टाग्रामवर @factsbook2024 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर संजयची कथा शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओत सांगण्यात आलं आहे की, अनेक वर्षांपासून व्यक्ती आपल्या तोंडात पिनांना ठेवून जगत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.