

इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ
महिलेच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची किंवा संकोचाची खूण दिसत नाही
व्हिडिओ सोशल मिडिया साई़डवर तुफान व्हायरल
Mumbai Local Train Viral Video : एकी कडे गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेन मध्ये बसायला जागा नसणे ही एक लोक ट्रेन मधली सामान्य गोष्ट आहे. पण एका वृद्ध महिलेने यावर एक उपाय शोधून काढला जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. बसायला नियमित जागा न मिळाल्याने, तिने आपली स्वतःची हिरवी प्लास्टिकची खुर्ची डब्याच्या मध्यभागी ठेवली आणि ही वृध्द महिला आरामात बसली. जवळचे प्रवासी तिच्या कडे पाहत बसले, तर काही जण हसत होते.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यातला हा व्हिडिओ दिसतो आहे. या व्हिडिओत काही महिला नेहमी प्रमाणे आपल्या जागी बसल्या आहेत. तर काही उभ्या आहेत. डब्याच्या मध्यभागी असलेल्या रिकाम्या जागेत एक वृद्ध महिला तिच्या हिरव्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसली आहे.
या वृध्द महिलेने आपल्या मांडीवर एक पांढरी बॅग ठेवली आहे. एक हात खुर्चीच्या आर्मरेस्टवर ठेवला आहे आणि दुसऱ्या हाताच्या बोटांवर आपला गाल टेकवला आहे, आणि ती शांतपणे बाहेर पाहत आहे. तिची बसण्याची पद्धत इतकी आरामशीर आहे की जणू ती घरातल्याच खुर्चीवर बसली आहे. असे या व्हायरल व्हिडिओत वाटते.
व्हिडिओमध्ये हे दृश्य पाहून जवळ बसलेल्या महिला हसताना दिसत आहेत. काही लोक हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आपले फोन बाहेर काढत आहेत. त्या महिलेच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची किंवा संकोचाची कोणतीही खूण दिसत नाही. ती पूर्ण आरामात प्रवासाचा पुरेपूर आनंद घेत आहे. तिला पाहून अनेक प्रवासी हसणे थांबवू शकले नाहीत. त्या महिलेच्या शांत स्वभावामुळे हा व्हिडिओ आणखी खास बनला आहे. ती कोणाशीही बोलत नाहीये किंवा तिला कोणतीही अस्वस्थता जाणवत नाहीये. ती फक्त तिच्या खुर्चीवर बसून बाहेरचे दृश्य पाहत आहे. हा साधेपणा आणि आत्मविश्वास या व्हिडिओला अविस्मरणीय बनवतो.
हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया साई़डवर तुफान व्हायरल होतोय. सोशल मिडिया युजर्सने याला 'जुगाड'चे उत्तम उदाहरण म्हटले आहे. लोकल ट्रेनमध्ये जागा मिळवण्यासाठी फार कमी लोक इतके टोकाचे प्रयत्न करतात, असे अनेक कमेंट्समध्ये नमूद केले आहे. काहींनी त्या महिलेच्या धैर्याचे आणि आरामाच्या इच्छेचे कौतुक केले आहे. तर काहींनी याला एक मजेशीर क्षण म्हटले. काहींनी गंमतीने लिहिले की लोकल ट्रेनमध्ये स्वतःची सीट आणणे हा एक ट्रेंड बनेल. तर काहींनी सुरक्षितता आणि जागेच्या कमतरतेबद्दल प्रश्न उपस्थित केले, तरीही एकूण प्रतिसाद सकारात्मक आणि हलकाफुलका होता.
लोकल ट्रेनमधील गर्दी ही सर्वसामान्य जनतेला नेहमीच एक आव्हान ठरणारी आहे. गर्दीच्या वेळी, विशेषतः महिलांच्या डब्यात जागा मिळवणे अवघड असू शकते. म्हणून या महिलेने स्वतःची खुर्ची आणून ही समस्या सोडवली. हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांच्या मते, गरजेच्या वेळी लोक कसे कल्पक मार्गांचा अवलंब करू शकतात, हे या दृश्यातून दिसून येते.