सध्या खाद्यपदार्थातील भेसळ आणि यांच्या थक्क करणाऱ्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत आहेत. अशातच आता यात आणखीन एका नव्या घटनेचा समावेश झाला आहे. यात एका महिलेने ऑर्डर केलेल्या आइस्क्रिममध्ये चक्क मृत सेंटीपीड सापडल्याचा दावा केला जात आहे. ही घटना उत्तर परदेशातील नोएडा येथील आहे.
नोएडा सेक्टर-12 मध्ये राहणाऱ्या दीपा यांनी शनिवारी ब्लिंकिटमधून अमूल व्हॅनिला आईस्क्रीमची ऑर्डर दिली. मात्र जेव्हा तिन्ही आईस्क्रीम बॉक्स उघडला तेव्हा त्यान्ना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना यात चक्क एक मृत सेंटीपीड गोठलेला दिसला. या धक्कादायक घटनेबद्दल, दीपाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सविस्तर सांगितले आहे. दरम्यान आता हा विडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ब्लिंकिटने दीपाचे पैसे परत केले आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. अमूलनेही दीपाशी संपर्क साधून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर फूड डिपार्टमेंट टीमने दीपाच्या व्हिडिओची दखल घेत तपासासाठी तिचे घर गाठले. चौकशीनंतर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी सेक्टर-२२ मध्ये असलेल्या ब्लिंकिट स्टोअरला भेट दिली जिथून आईस्क्रीम पाठवले जात होते. अधिकाऱ्यांनी आइस्क्रीम व्हॅनिला कार्टनची तपासणी केली आणि नमुने चाचणीसाठी पाठवले. दरम्यान दिवसेंदिवस अशा घटना वाढतच आहेत. मागेच काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरच्या आइस्क्रिममध्ये मानवी बोट आढळून आले होते. या घटनांकडे लक्ष देत ऑनलाईन फूड ऑर्डर करताना विशेष खबरदारी घेणे फार गरजेचे आहे.