हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकतो! व्यक्तीने गाडीला असे मॉडिफाईड केले की लोकांचे डोळे खुलेच्या खुलेच राहिले, Video Viral
उपासमार आणि आर्थिक संकटाने ग्रासलेल्या पाकिस्तानातील लोकांचे जीवन आता जुगाडवर अवलंबून आहे. त्याची झलक सोशल मीडियावरही पाहायला मिळते. पाकिस्तानमधील अनेक अनोख्या जुगाडांचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एक अजब-गजब जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात व्यक्तीने आपल्या चारचाकीला असे मॉडिफाईड केले आहे की पाहून कुणालाही धक्का बसेल. यातील दृश्ये पाहून तुम्ही डोक्याला हाथ लावल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर पाकिस्तानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका व्यक्तीने आपल्या हुशारीचा वापर करून टेस्ला कारची कॉपी बनवली. ते पाहता टेस्ला कारची बॉडी दुसऱ्याच कारमध्ये बसवण्यात आली आहे, असे वाटते. तुम्ही आजपर्यंत गाडीचा असा बदल नक्कीच कधीही पाहिला नसेल. जर इलॉन मस्कने टेस्ला कारचा असा अपमान पाहिला तर कदाचित तो अशा कार बनवणेच बंद करेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण पाकिस्तानची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात दिसते की एका व्यक्तीने आपल्या कारमध्ये बदल करून टेस्ला इलेक्ट्रिक कारसारखे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त कारचे शरीर टेस्ला कारसारखे दिसते, बाकी सर्व काही सामान्य कारसारखे दिसते. संपूर्ण कारचे हे रूप पाहता, टेस्ला कार आजारी पडून तिची अवस्था खूपच कमकुवत झाल्यासारखे वाटते. व्हिडिओमध्ये, तो माणूस बनावट टेस्ला कारमध्ये बसून आनंदी होताना आणि त्याची बनावट टेस्ला कार मोठ्या अभिमानाने रस्त्यावर चालवताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून लोक आता कारची ही अनोखी झलक पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
Tesla launched in Pakistan 😂 pic.twitter.com/wUPGi4QlQj
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) January 21, 2025
दरम्यान गाडीचा हा व्हायरल व्हिडिओ @FrontalForce नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘टेस्ला पाकिस्तानमध्ये लाँच झाला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स देखील दर्शविल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे टेस्ला नाही टस्ला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांनी हे कसे तयार केले असेल, हे त्यांचे स्वतःचे मॉडेल वाटत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.