पांचट Jokes : आमचे सल्ले तुमचा विकास…. आता बस झाला फाजीलपणा, जरा इकडे लक्ष द्या; हसवून घेण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! हे सल्ले जीवनात कामी येतील की नाही याची शाश्वती आम्ही देत नाही पण तुम्हाला हसवण्यात यांचा मोठा वाटा असेल इतकं मात्र नक्की. कामातून थोडा वेळ काढा आणि चेहऱ्यावर हसू आणा.
इंग्रजी सारखेच मराठी त सुध्या काही शब्द SILENT असतात..
उदाहरणार्थ….
जेव्हा दुकानदार म्हणतो ” तुम्हाला जास्त नाही लावणार” तेव्हा त्यामध्ये “चुना” हा शब्द SILENT असतो..
जेव्हा लग्न ठरवत असतात तेव्हा सांगतात “आमची मुलगी गाय आहे” तेव्हा त्या मध्ये “शिंगावाली” हा शब्द SILENT असतो
लग्नानंतर बायकोला घेऊन निगतांना सासरे सांगतात “जावई सांभाळा” त्या मध्ये “स्वतःला” हा शब्द SILENT असतो..
फक्त गमंत हं..!!