Panchat Jokes Babaji Funny Gyaan Will Make You Laugh Out Louder Read Marathi Jokes
पांचट Jokes : परमज्ञानी बाबाजींचं फाल्तू ज्ञान ऐका आणि आपल्या आयुष्यात हास्याची बहार आणा; वाचाल तर हसाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! बाबाजींचं परमज्ञान उघडेल तुमचे डोळे, करेल हास्याचा कल्लोळ आणि वाचून तुम्हीही म्हणाल, "हे ज्ञान काही कामाचं नाही". कामाच्या व्यस्त जीवनातून वेळ काढा आणि पोट धरून हसण्यासाठी सज्ज व्हा.
जर वारा आला तर पानं हलणार
जर वारा आला नाही तर पानं हलणार नाहीत
आता धन्यवाद म्हणू नकोस, जोपर्यंत माझ्याकडे ज्ञान आहे तोपर्यंत मी ते देत राहीन…
वत्स – बाबाजी, माझ्या उजव्या हातात खाज येत आहे.
बाबाजी – बेटा, लक्ष्मी येणार आहे.
वत्स – बाबाजी, माझ्या उजव्या पायातही खाज येत आहे.
बाबाजी – बेटा, प्रवास होण्याची शक्यता आहे.
वत्स – बाबाजी, माझ्या पोटावरची खाज येत आहे.
बाबाजी – तुला चांगलं जेवण मिळेल.
वत्स – बाबाजी, माझ्या मानेलाही खाज येत आहे.
बाबाजी – निघून जा, अरे हरामी, तुला खाजेची समस्या आहे…!
जीवनाच्या धावपळीत तुमच्या आरोग्याची काळजी घ्या…
असे होऊ नये की…
तुम्ही मागे राहाल…
आणि तुमचे पोट पुढे निघेल…
बाबा फॅशन टीव्ही पाहत होते, एका माणसाने ते पाहिले…
व्यक्ती म्हणाला – बाबा बाबा, तुम्हीही?
बाबाजी – देवाची शपथ! मी या मुलींकडे “तिरस्काराच्या नजरेने” पाहत आहे…
महिला – बाबाजी बाबाजी मला ना माझा नवरा घरी येताच खूप मारतो, मी काय करू?
बाबाजी – एक काम करा, हा तावीज घे आणि घरी गेल्यावर तोंडात घाल
काही दिवसांनी महिला परत बाबाजींकडे आली आणि म्हणाली
महिला – बाबाजी, मला खरंच फायदा झाला, माझा नवरा आता मला नाय मारत
बाबाजी – अरे फायदा तावीजचा नाही तर तुझं तोंड बंद ठेवल्याने झाला आहे…
नवरा – बाबाजी, आनंदी वैवाहिक जीवनासाठी मला एक मंत्र सांगा…
बाबाजी – बेटा, जोपर्यंत तुझे तोंड बंद आहे आणि तुझे पर्स उघडे आहे तोपर्यंत तुला आशीर्वाद मिळत राहील…
बाबांच्या आश्रमातील एक माणूस बाबांजवळ आला आणि म्हणाला..
माणूस – बाबाजी, मी बऱ्याच दिवसांपासून पूजा-अर्चनावर मन लावण्याचा प्रयत्न करत आहे पण माझं मन लागत नाहीये, कृपया मला उपाय सांगा…
बाबाजी – बेटा, एक काम कर… त्या पूजा आणि अर्चनाला माझ्याजवळ पाठव, काय माहिती माझं त्यांच्यावर मन लागेल…
बाबाजी – हे देवा, मला त्रास दे, दु:ख दे, जगातील दुःख-कष्ट मला देऊन टाक…
शिष्य – बाबाजी, तुम्ही इतक्या मागण्या का करता?
फक्त एक बायको मागा ना…
आजचे ज्ञान…
चुका या पाठीसारख्या असतात…
स्वतःच्या दिसत नाहीत, बाकी सगळ्यांच्या दिसतात…
माहितीये तुला काय बोलायचंय पण बोलू नकोस…
बाबाजींचे फालतू ज्ञान…
रोज एका तरी व्यक्तीकडे बघून हसत चला
म्हणजे तो व्यक्ती आपल्या सर्व समस्या विसरून हा विचार करत बसेल की, “भेंडी हा नक्की होता कोण?”
आजचं ज्ञान संपलं आता कल्टी मार….!!
Web Title: Panchat jokes babaji funny gyaan will make you laugh out louder read marathi jokes