पांचट Jokes : बायकोची प्रशंसा की पैशांची बचत? नवरा-बायकोचे खट्याळ विनोद वाचाल तर हसून हसून जमिनीवर लोटपोट व्हाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! नवरा-बायकोचे नाते फक्त प्रेमानेच नाही तर खट्याळ मस्करी, वाद-विवाद यांनी भरलेले असते. या नात्यातही हास्याचा उद्रेक दररोज होत असतो. नवरा-बायकोचे विनोदी संभाषण वाचा आणि मोठ्याने हसा.
बायको – मी आज कशी दिसतेय…?
नवरा – तू छान दिसत आहेस
बायको – माझ्यासाठी एक शायरी म्हणा मग…
नवरा – ही जो तू इतकी सुंदर दिसतेय, यावर सगळा माझा पगार खर्च करतेय…
बायको – मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही
नवरा – ठीक आहे
बायको – तुम्हाला कारण नाही जाणून घ्यायचं?
नवरा – नाही, मी तुझ्या निर्णयाचा मान राखतो…
नवरा – मी दुबईला जात आहे.
बायको – मीही येईन. मला दागिने खरेदी करायचे आहेत
नवरा – मी सिंगापूरला जात आहे.
बायको – मीही येईन. मला मेकअप खरेदी करायचा आहे
नवरा – मी लंडनला जात आहे.’
बायको – मीही येईन. मला परफ्यूम खरेदी करायचे आहे
नवरा (चिडून) – मी नरकात जात आहे
बायको – देवाने दिलेलं सर्व काही आहे, फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या…
बायको – मला एक नवीन साडी हवी आहे, अम्माजान कडून मागवा..
नवरा – बावळट बाई, ती अम्मा जान नाहीये, ते Amazon आहे
बायको – लवकर उठा मी चपाती बनवत आहे…
पती – हा मग मी कुठे तव्यावर बसलो आहे…
बायको – तुम्ही कोणतंही काम ठीक करत नाही
नवरा – का काय झालं, आता मी काय केलं?
बायको – तुम्ही काळ सिलेंडर लावून दिल होत ना
नवरा – हा मग काय झालं
बायको – कालपासून दोनदा माझी भाजी करपली आहे…
बायको नवऱ्याला मारत होती
तितक्यात तिथे सासू आणि तिने जाब विचारला
बायको म्हणाली – काय नाय ते आयुर्वेदिक औषध आणलं होत, डॉक्टरांनी सांगितलं कुटून द्यायला…
एक आत्मनिर्भर नवरा स्वतः किचनमध्ये गेला
त्याने चार ब्रेड घेतले आणि त्यावर पुदिन्याची चटणी लावून खाल्ली
बायको आल्यापसिन नवरा गप्प आहे आणि
बायको विचारून विचारून थकली आहे की, किचनमधील मेहंदी नक्की गेली कुठं?
बायको – पूजा करा, मोठ्या मोठ्या समस्यांपासून सुटका होते…
नवरा – तुझ्या वडिलांनी खूप पूजा केली असेल,
म्हणून तर त्यांची समस्या टळली आणि ती माझ्या गळी पडली…
Web Title: Panchat jokes wife caught husbands cleverness and from here laughter outburst read husband wife funny jokes in marathi