सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही जण जीवघेणे स्टंट करून स्वतःचा मोक्कार फायदा करून घेतात, तर काही जण जीवाचा खेळ करता करता जीव गमावून बसतात. अशीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील, कारण यामध्ये ते खेळ दाखवण्यात आले आहे, जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे. व्हिडीओ कदाचित पूर्व-आशियाई देशातील असल्याचे दिसून येत आहे, यावरून आपण अंदाज बंधू शकतो की आपण आपल्या लहानपणी खेळलेले ते खेळ जगभरात खेळले जातात किंवा जगभरात प्रचलित आहेत.
सोशल मीडियावर ही व्हिडीओ शेअर करण्यात आली असून व्हिडीओ @kk.meme11 या इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ४ ते ५ तरुण खेळ खेळत आहेत. या खेळामध्ये जमिनीवर बॉक्स आखले जातात. त्यानंतर त्या बॉक्सच्या बाहेर न जाता, त्यातून उड्या मारत, तो आखाडा पार करायचा असतो. सगळ्यांना ज्ञात असलेल्या या खेळामध्ये विशेष असे की या तरुणांनी बॉक्सच्या रेघांना खडूने आखले नसून त्यावर पेट्रोल टाकले आहे आणि बॉक्सच्या रेघा आगीने बनव्यात आल्या आहेत.
या आगीतून स्वतःला सावरता ते तरुण हा जीवघेणा खेळ खेळत आहेत. एक चूक त्यांच्या जीवावर बेतणारी आहे. पण सुदैवाने अनेक तरुण या आगीत पडता-पडता वाचले आहेत. मुळात, या तरुणांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसून येत नाही. स्वतःच्या इच्छेने मज्जे घेत हे तरुण हा जीवघेणा खेळ खेळत आहेत.
सोशल मीडियावर या व्हिडीओने लाखोंच्या संख्येत प्रेक्षक मिळवले आहेत. तर १५,००० पेक्षाही जास्त नेटकऱ्यांच्या पसंतीस ही व्हिडीओ लाईक्स केले असून एकूण 15,759 जणांनी ही व्हिडीओ लाईक्स केले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक जीवघेणे प्रकार वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असतात. हा प्रकार त्यातलाच एक असून मोठ्या संख्येने यांना पाहिले जाते.