भारतात निघाली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अंत्ययात्रा; ट्रम्पच्या तेराव्याच्या जेवणाला दिले खास निमंत्रण, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. त्यांच्या टॅरिफधोरणामुळे तर सध्या संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी अनेकांना आपले शत्रू करुन घेतले आहे. दरम्यान सोशल मीडियावर गेल्या काही काळात त्यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरल्या आहे. ट्रम्प अचानक गायब झाले असल्याचे सांगितले जात आहे. या अफवांदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची अंत्ययात्रा काढली जात आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या भोपाळमधील आहे.
डोनाल्ड ट्रम्प विरोधात मध्य प्रदेशात आंदोलन सुरु आहे. यावेळी त्यांची अत्यंयात्रा काढण्यात आली आहे.लोकांना त्यांच्या तेराव्यालाही बोलवण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील गणवर्ता पार्टीने ही अत्यंयात्रा काढली आहे. या पार्टीने डोनाल्ड ट्रम्पवर भारताशी गद्दारी केल्याचा आरोपही लावला आहे. ट्रम्पमुळे भारताच्या सामान्य नागरिकांवर याचा परिणाम होत आहे. यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. असा आरोप गणवर्ता पार्टीने केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावर अनेक फ्लेक्स लावण्यात आले आहे. यामध्ये ट्रम्पच्या मृत्यूनंतर अत्यंसंस्काराचे जेवणे दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तुम्ही पाहू शकता की, एक पाढंऱ्या चादरीवर ट्रम्प यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर शेणही ठेवण्यात आले आहे, चप्पलाही ठेवण्यात आल्या आहेत. एक माणूस मडके घेऊन उभा आहे.लोक ट्रम्पविरोधी घोषणा देत असून त्यांचे पोस्टर जाळण्यात आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हीरोपंती की पागलपंती? रिलसाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला तरुण; इतक्यात ट्रेन आली अन्…; Video Viral
व्हायरल व्हिडिओ
The last rites of US President Donald Trump were performed by the saffron party in Bhopal.
A large number of people were present on this occasion. 🤣🤣#PeterNavarro #MARK #NotTrump #DonaldTrump #America pic.twitter.com/DzSaha6qIQ— mukarram ali (@Mukarra49932597) September 1, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Mukarra49932597 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी ट्रम्पविरोधी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्रम्प पाकिस्तान आणि दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचेही लोकांनी म्हटले आहे. अनेकांनी ट्रम्पमुळे त्यांना परदेशात शिक्षण घेणे कठीण झाल्याचे म्हटले आहे.
‘बाहेर पडा सर्वांनी…लंकापती रावण’ चालला भाजी विकायला! Viral Video पाहून जमिनीवर हसूनहसून लोळाल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.