Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! पुण्यात एका महिलेला बेदम मारहाण, नाकातून रक्त अन् Video होतोयं Viral

भरदिवसा चालू रस्त्यात महिलेवर गंभीर हल्ला करण्यात आला. यात महिला अक्षरशः रक्तबंबाळ झाली आहे. सदर घटना पुण्याची असून आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2024 | 11:35 AM
! पुण्यात एका महिलेला बेदम मारहाण

! पुण्यात एका महिलेला बेदम मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्हेगारीचे नवीन स्पॉट बनले आहे. दिवसेंदिवस पुण्यातील गुन्ह्यांची संख्या काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. त्यातच आता या घटनांमध्ये आणखीन एका घटनेचा समावेश झाला आहे. पुण्यात एका महिलेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर तिची अवस्था पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक चर्चेला विषय बनला आहे.

नक्की प्रकरण काय?

झाले असे की, बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका महिलेला ओव्हरटेक करत तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. संबंधित महिला एक डिजिटल कंटेंट क्रिएटर असून हल्ला झाला त्यावेळी तिच्यासोबत दोन मुलेही होती. तिच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महिलेने एक व्हिडीओ शुट करत आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील तिची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

धक्कादायक घटनेला बळी पडल्या महिलेचे नाव जेरीलन डिसिल्वा असे आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर गाडीवरून आपल्या दोन मुलांसह चालली होती. यावेळी अचानक काहींनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे, हे बघताच महिलेने त्या गाडीला बाजूने जाण्यास जागा दिली. मात्र यानंतर जे झाले त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. गाडीने पुढे जाण्याऐवजी त्यातील चालक बाहेर आला आणि त्याने अचानक डिसिल्वा यांच्या चेहऱ्यावर जोरदार बुक्का मारला. महिलेला काही कळेल याआधीच तिच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला.

हेदेखील वाचा –  वारीची पुण्याई! आषाढी वारीवरून घरी आलेल्या आईसाठी मुलाने घातल्या फुलांच्या पायघड्या, Video Viral

जेरीलन डिसिल्वा यांनी सांगितले की, हल्ला करणारा व्यक्ती हा वृद्ध होता आणि तो वेगाने गाडी चालवत होता. महिलेने सोशल मीडियावर या घटनेनंतरचा व्हिडिओ पोस्ट करत दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डिसिल्वा यांच्यावर बाणेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोराने 2 किलोमीटरपासून आपला पाठलाग केल्याचेही महिलेने म्हटले आहे.

दरम्यान आता या संपूर्ण घटनेनंतर पुणे पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर आता पुणे दिवसाही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये सदर घटनेची माहिती दिलेली आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत सदर घटनेविषयी खेद व्यक्त केला आहे.

 

Web Title: Pune digital content creator jerrylan dsilva beaten up on road shocking video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • Pune Accident

संबंधित बातम्या

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक; तीन गाड्यांचे नुकसान
1

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक; तीन गाड्यांचे नुकसान

मोठी बातमी! पुण्यात भीषण अपघात; पिकअप रिव्हर्स आली अन् थेट…; ८ भाविकांवर काळाचा घाला
2

मोठी बातमी! पुण्यात भीषण अपघात; पिकअप रिव्हर्स आली अन् थेट…; ८ भाविकांवर काळाचा घाला

Pune News: दुर्दैवी! मातीच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकले; एकाचा मृत्यू, नांदेड सिटीलगतची घटना
3

Pune News: दुर्दैवी! मातीच्या ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकले; एकाचा मृत्यू, नांदेड सिटीलगतची घटना

बारामतीत भीषण अपघात, ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांसह २ मुलींचा जागीच मृत्यू
4

बारामतीत भीषण अपघात, ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांसह २ मुलींचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.