USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हा व्हिडीओ yuvaanibanez नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आला आहे. त्यात दिसणाऱ्या मुलाचं नाव युवान आहे. तो सध्या अमेरिकेत जॉब करतोय. त्याने त्याचीच गोष्ट सांगितली आहे.काही वर्षांपूर्वी तो भारतात असताना अचानक बेशुद्ध पडला होता. घरच्यांनी लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे कसलीही कागदपत्रं, फॉर्म भरायची कटकट नाही.
डॉक्टरांनी लगेच त्याला ऍडमिट करून घेतलं. चांगली प्रायव्हेट रूम दिली. लगेच ECG काढला, MRI, CT स्कॅन, रक्ताच्या टेस्ट सगळं काही करून टाकलं. लगेच रिपोर्ट आले आणि आजार काय आहे ते सांगितलं. या सगळ्यासाठी त्याला फक्त 500 डॉलर म्हणजे आपले 47 हजार रुपये लागले.पण हाच प्रसंग जेव्हा अमेरिकेत घडला तेव्हा चित्र पूर्ण वेगळं होतं.
अमेरिकेत रुग्णवाहिका बोलावली तर हजारो डॉलर लागतात म्हणून तो स्वतःच गाडी चालवत हॉस्पिटलला गेला. तिथे गेल्यावर लगेच डॉक्टर भेटेल असं वाटलं होतं, पण तसं झालंच नाही. आधी फॉर्म भरा, विम्याचे कागद दाखवा, या सगळ्यात त्याला दीड तास वेटिंग रूममध्येच बसावं लागलं. त्रास होत असताना सुद्धा कोणी लक्ष देत नव्हतं.नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुला छोटा हार्ट अटॅक येऊन गेला आहे.
View this post on Instagram
त्यानंतर टेस्ट सुरू झाल्या. पण एकदा डॉक्टर भेटल्यावर परत डॉक्टरला भेटणं म्हणजे मोठं काम. तो म्हणाला मी डॉक्टरांना भेटायचा प्रयत्न केला, तर सांगितलं डॉक्टर खूप बिझी आहेत.आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे बिल. त्या एका उपचारासाठी हॉस्पिटलने 23 हजार डॉलरचं बिल दिलं. म्हणजे आपले जवळपास 22 लाख रुपये लागले.
त्याच्याकडे हेल्थ इन्शुरन्स होता तरीही त्यातले 7 हजार डॉलर म्हणजे 6 लाख 67 हजार रुपये त्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागले.हाच अनुभव सांगताना तो म्हणतो, अमेरिकेत हवा चांगली आहे, रस्ते, बिल्डिंग सगळं भारी आहे. पण आजारी पडलात तर मात्र खूप हाल होतात. सगळं काम खूप सावकाश चालतं. भारतात डॉक्टर लगेच धावून येतात, तसं तिथे होत नाही.
View this post on Instagram
त्यामुळे त्याने आता ठरवलंय की तो परत भारतात येणार आहे.त्याचा हा व्हिडीओ आता 50 हजारांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. खाली बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आहेत. बऱ्याच जणांनी म्हटलंय की खरंच, पैसा सगळं काही नसतो, वेळेवर उपचार मिळणं जास्त महत्त्वाचं असतं.






