Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रावणाला जाळायला निघालेले मात्र खुद्द रावणानेच लोकांवर सोडले अग्नीबाण, Viral Video पाहिलात का?

दसऱ्यादिवशी रावण दहनाचा एक धक्कादायक आणि अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लोकांनी जाळलेला रावणच लोकांवर अग्नीबाण सोडताना दिसून येत आहे. हजारो लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसून येत आहेत. घटना इतकी थरारक होती की पाहून पोलीसदेखील आवाक् झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2024 | 11:22 AM
रावणाला जाळायला निघालेले मात्र खुद्द रावनानेच लोकांवर सोडले अग्नीबाण, Viral Video पाहिलात का?

रावणाला जाळायला निघालेले मात्र खुद्द रावनानेच लोकांवर सोडले अग्नीबाण, Viral Video पाहिलात का?

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण देशभरात दसरा हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते. यादिवशी अनेकजण आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. या दिवशी रावण दहनदेखील केले जाते. सध्या दसऱ्यानिमित्त रावण दहनाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रावण दहनाच्या व्हिडिओत चक्क रावणच लोकांवर प्रहार करताना दिसून येत आहे. लोकं अग्निबाण सोडून रावणाला जाळण्याचा प्रयत्न करत होते मात्र सर्व उलटेच घडले. पुढे खरंतर रावणानेच लोकांवर अग्नीबाण सोडले. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

काय आहे व्हिडिओत?

दसऱ्याच्या दिवशी रावणाचा एक भलामोठा पुतळा उभारला जातो. या पुतळ्यामध्ये गवत, कापड्याच्या चिंध्या, सुकी लाकडं, फटाके अशा विविध गोष्टी भरल्या जातात आणि संध्याकाळी याला आग लावून याचे दहन केले जाते. सत्याचा असत्यावर विजयाचे प्रतीक म्हणून रावणाचा वध केला. या व्हायरल व्हिडिओमध्येही असाच काहीसा प्रकार करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र नंतर काही भलतेच घडून बसते.

हेदेखील वाचा – झेरॉक्सच्या दुकानाबाहेर मालकाने लावली अशी पाटी…पाहून सर्वच दंग, मार्केटिंगची हटके आयडिया पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर दिसते की, रावण धवनाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात पेटलेला रावण आणि त्यासमोर काही अनेक लोक उभी असल्याचे दिसत आहेत. हे सर्व लोक रावन दहन पाहायला आलेली असतात मात्र रावणावर केलेला वार उलटा पडतो. रावणाच्या टाकलेले फटाके पेट घेताच सर्वत्र उडू लागतात आणि अग्नीचे वार लोकांच्या अंगावर पडू लागतात. अंगावर येणाऱ्या या अग्नीपासून आपले बचाव करण्यासाठी सर्वजण पळू लागतात. हे सर्व दृश्य पाहून तेथील पोलीस कर्मचारीदेखील आवाक् होतात. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक लोक व्हिडिओतील दृश्ये पाहून थक्क झाले आहेत.

मुज़फ़्फ़रनगर में अपने को जलाए जाने से क्रुद्ध रावण ने मौक़े पर मौजूद लोगों पर अग्नि-वाण चलाए 😬 pic.twitter.com/zuDmH3dKXa

— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) October 5, 2022

हेदेखील वाचा – Video Viral: गवत चरताना गाईसमोर अचानक आला कोब्रा, फणा काढून उभा राहिला मग गाईने जे केले…पाहून दंग व्हाल

हा व्हायरल व्हिडिओ @umashankarsingh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मुझफ्फरनगरमध्ये स्वतःला जाळल्यानंतर संतप्त झालेल्या रावणाने घटनास्थळी उपस्थित लोकांवर बाण सोडले असे लिहिण्यात आले आहे. अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “रावणही म्हणतोय की आधी तुझ्या आतल्या रावणाला जाळ, मग मी जाळून घेईन” तर दुसऱ्या युजरेने लिहिले आहे, “सध्या आदिपुरुषाची सगळीकडे एवढी चर्चा सुरू आहे की रावणजीही संतापले आहेत आणि त्यांना जाळणाऱ्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे”.

Web Title: Ravan fires back at the people while they set fire to him on dasara night video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • Ravan Dahan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.