गरीब फुगेवाल्याला बसवलं 5 कोटींच्या पोर्शे गाडीत, चिमुकलीचा आनंद पाहून डोळे पानावतील, हृदयद्रावक Video Viral
सध्याच्या काळात माणुसकी कुठेतरी हरवली आहे. माणसाने फक्त शरीरानेच नाही तर मानानेही माणूसकी जपायला हवी. सध्या कोणतीही दुर्घटना घडली की लोक मदत कमी पण व्हिडिओ काढायला पहिले पुढे जातात. आताच्या जगात कोणाला कोणाचा आनंद, दुःख महत्ताचे वाटतं नाही. प्रत्येकजण आपल्याच दुनियेत मग्न असतो. मात्र यातच सध्या एक सुंदर आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यामध्ये एक पोर्शे गाडीचा मालक आपल्या करोडोंच्या गाडीची सफर एका फुगेवाल्याला देताना दिसत आहे. गाडीत बसल्यावर फुगेवाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
व्हिडिओत एका रस्त्यावर एक फुगेवाला आपल्या चिमुकल्या मुलीला कड्यावर घेऊन फुगे विकताना दिसतो. तितक्यात त्याच्या समोर एक पोर्शे गाडी येऊन थांबते. यानंतर गाडीतून मालक या फुगेवाल्याला बाहेर येतो आणि तू काय करतो आहेस असा जाब त्याला विचारतो. गाडीच्या मालकाला पाहून फुगेवाला घाबरतो आणि माफी मागून तेथून निघण्याचा प्रयत्न करतो. मात्र यानंतर गाडीमालक त्याला रोखतो आणि गाडीत बसायला सांगतो. फुगेवाल्याला काही समजत नाही आणि तो तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागतो मात्र गाडीमालक त्याला थांबवतो आणि त्याला समजवत गाडीत फिरण्यासाठी त्याला कन्व्हिन्स करतो.
हेदेखील वाचा – बाइक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली, गळ्याला बसला फास अन् नंतर जे घडलं… घटनेचा Video Viral
यांनतर फुगेवाला संकोच करत गाडीत बसतो मात्र गाडीत बसताच त्याचा चेहऱ्यावर स्मित हास्य येते आणि आनंदाने तो गाडीच्या मुक्त सफरचा आनंद लुटतो. यावेळी तो आपल्याला मुलीचे हाथ पकडून डान्सदेखील करताना दिसतो. त्याचा आहे आनंद पाहून आता अनेकजण सुखावले आहेत तर काहींना आपले अश्रू अनावर झाले आहेत. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – बहिणीच्या लग्नाआधीच झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे अकाउंट झाले ब्लॉक, भरस्त्यात रडतानाचा Video Viral
हा व्हिडिओ @princevermareal नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “इतरांचा आनंद हाच आपला आनंद” असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. एका युजरने लिहिले, माणुसकी अजूनही जिवंत आहे तरं दुसऱ्या युजरने लिहिले, खरा माणूस आहेस तू…