गाडी चालवताना सावध राहते फार गरजेचे असते. दररोज भररसत्यावरचे नवनवीन अपघात समोर येत असतात. लहानश्या चुकीमुळे अनेकदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे रस्त्याने गाडी चालवता विशेष खबरदारी घेणे दार गरजेचे असते. गाडीवरून आपले जरा जरी नियंत्रण सुटले तर मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. इतकेच काय तर, या अपघातात फक्त अपघाती व्यक्तीचाच नाही तर इतर लोकांचाही जीव टांगणीला लागतो. त्यामुळे सावधानता पाळणे महत्त्वाचे ठरते.
सोशल मीडियावर अनेक अपघाताचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोक अनेकदा सूचना देऊनही निष्काळजीपणा करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात गाडी चालवताना अचानक तरुणीची ओढणी हँडलमध्ये अडकते आणि तिच्या गळ्याला ओढणीचा फास बसतो. या थरारक घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकलोक हा व्हिडिओ पाहून आवाक् झाले आहेत.
हेदेखील वाचा – हाहाहा! तरुणाने पुतळ्याशी केले लग्न, आधी हार घातला अन् मग… तुम्हीच पाहा पुढे काय घडले?
तर झाले असे की, एक तरुणी भरधाव वेगाने बाईक चालवत होती. बाईकचा वेग जास्त असल्यामुळे तिच्या गळ्यामधील ओढणी हवेत उडू लागली. दरम्यान या ओढणीचा एक भाग उडता उडता बाईकच्या हँडलमध्ये अडकला. परिणामी तरुणीची मान सुद्धा हँडलमध्ये अडकली. बरं, डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे तिला हालचाल देखील करता येत नव्हती.
शेवटी त्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत इमरजंसी ब्रेक दाबून बाईक थांबवली आणि हँडलमध्ये अडकलेली आपली मान बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात आसपासची लोकं सुद्धा या तरुणीला मदत करण्यासाठी धाव घेऊ लागली. त्यामधील एका व्यक्तीने शांतपणे तिची ओढणी हँडलमधून बाहेर काढली आणि तिचा जीव थोडक्यात बचावला.
हेदेखील वाचा – बहिणीच्या लग्नाआधीच झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे अकाउंट झाले ब्लॉक, भरस्त्यात रडतानाचा Video Viral
या घटनेचा व्हिडिओ @nusti_bhatkantii नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 7 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिले आहेत. हा धक्कादायक व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले मात्र सुदैवाने तरुणीला काहीही झाले नाही आणि तिचा जीव बचावला. घटनेचा व्हिडिओ सध्या फार व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये तरुणीला मदत करण्यासाठी धाव घेणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.