Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Chhatrapati Sambhajinagar Kachori Incident: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वैजापूर शहरातून खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका कचोरीच्या दुकानातून आणलेल्या पदार्थात उंदराच्या लेंड्या आढळल्याचा घाणरेडा किळसवाणा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात नाराजीचा सुर धरला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एका ग्राहकाने वैजापूरमधील कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या घरी नेल्या. घरात पार्सल उघडल्यानंतर कचोरीच्या सारणात संशयास्पद घाण दिसून आली. बारकाईने पाहिल्यावर त्यामध्ये उंदराच्या लेंड्यांसारखे पदार्थ असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, हा प्रकार समजण्याआधी घरातील लहान मुलांनी दोन कचोऱ्या खाल्ल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. Sambhajinagar Crime:
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील अजबनगर परिसरातील एका हॉटेलमधील आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. ‘बोडखे काकू’ हॉटेलच्या जेवणाच्या भागात उंदीर फिरताना दिसल्याचा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. ग्राहक बसलेल्या जागेच्या आसपासच उंदीर फिरताना दिसत असल्याने हॉटेलच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खाद्यपदार्थ विकणाऱ्या ठिकाणी उंदरांचा वावर असणे ही गंभीर बाब मानली जाते. कारण अशा ठिकाणी अन्नपदार्थ दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाकघर, साठवणूक जागा आणि ग्राहकांसाठी असलेल्या भागाची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे.






