Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लोकशाहीमुळे मला मारत नाही बाबा’,प्रजासत्ताक दिनाला चिमुकल्याचं भन्नाट भाषण,Video एकदा बघाच

भारताचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य सोहळा राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झाला. या निमित्ताने अनेकांनी जोरदार भाषणे ठोकली. पण या सर्वांत एका शाळकरी मुलाचे भाषण चांगलेच व्हायरल (Viral Video) झाले.

  • By साधना
Updated On: Jan 28, 2023 | 06:12 PM
republic day kid speech video

republic day kid speech video

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. प्रजासत्ताक दिनी एका शालेय विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणाचा (Republic Day Speech) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बालगोपाळांना लोकशाहीचा कसा फायदा होतो, याचे सुंदर वर्णन या मुलाने त्याच्या भाषणात केले आहे. त्याचे सव्वा मिनिटांचे हे भाषण ऐकून सगळेच पोट धरून हसले अन् टाळ्यांचाही कडकडाट केला.

भारताचा प्रजासत्ताक दिन गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य सोहळा राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झाला. या निमित्ताने अनेकांनी जोरदार भाषणे ठोकली. पण या सर्वांत एका शाळकरी मुलाचे भाषण चांगलेच व्हायरल झाले. या चिमुकल्याने आपल्या बोलण्यातून लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगितले.

भाषणात काय म्हणाला विद्यार्थी
“खरंतर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता. भांडू शकता. दोस्ती करू शकता. प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला. खोड्या करायला. रानात फिरायला. माकडासारखे झाडावर चढायला आवडते. असे केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण, ते लोकशाहीला मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात, तसं सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही.”

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कोणत्या शाळेमधील आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. पण नेटकऱ्यांना लोकशाहीची व्याख्या मात्र चिमुकल्याने जबरदस्त भाषेत समजावली आहे. हा व्हिडिओ पाहून लोक या मुलाचं कौतुक करत आहेत. काहींना तर हासू अनावर होत आहे.

Web Title: Small boy speech about democracy video went viral nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2023 | 06:02 PM

Topics:  

  • Republic Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.