Teachers Day: आपल्या अंतिम क्षणातही शिक्षक मुलांचा अभ्यास चेक करत राहिला अन्... ह्रदयद्रावक Video पाहून अनेकांना अश्रू अनावर
ज्ञानाचे दीपस्तंभ मानल्या जाणाऱ्या शिक्षकांची देवाशी तुलना केली जाते. असे म्हणतात की हे जग ईश्वराची देणं आहे. देवानेच हे संपूर्ण जग घडवले आहे मात्र माणसाला कोणी घडवले असे विचारणे केले तर याचे उत्तर शिक्षक असेच देता येईल. आपले आयुष्य घडवण्यात शिक्षक फार मोठी जबाबदारी बजावत असतो. शिक्षक पद हे असे पद आहे की ज्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. देव सुद्धा आपल्या गुरूच्या आदरात डोके टेकवतो. असे सन्माननीय स्थान जे या जगाचे भविष्य घडवते. जो लोकांना शिकवतो आणि समाजात राहायला शिकवतो. आपल्या मुलांना आदर्श बनवण्यासाठी शिक्षक आपल्या सर्व जबाबदाऱ्या मोठ्या समर्पणाने पार पाडतो. शिक्षण दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला एका व्हायरल हृदयद्रावक पोस्टविषयी माहिती देत आहोत.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट फार व्हायरल होत आहे. या पोस्टमधूनच आपण शिक्षकाचे आपल्या विद्यार्थ्यांप्रति असलेलले समर्पण पाहू शकतो. आपल्या शेवटच्या क्षणीदेखील जीव तोडून आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे विचार करणाऱ्या या शिक्षकाची मिसाल या पोस्टमधून आपल्याला पाहायला मिळते. सैंड्रा ए वेनेगास द्वारे आपल्या आपल्या वडिलांचा शेवटचा फोटो आणि इमोशन नोट सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. सध्या ही पोस्ट फार वेगाने व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – पाकिस्तान ते पाकिस्तानच! उद्घाटन होताच लोकांनी लुटला मॉल, तासाभरात बिसनेसमॅन झाला कंगाल, Video Viral
व्हायरल पोस्टमध्ये आपण पाहू शकता की, सॅन्ड्राचे वडील रुग्णालयात दाखल आहेत आणि ते त्यांच्या लॅपटॉपवर काम करत आहेत. ते यावेळी आपल्या लॅपटॉपवर आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चेक करत असतात. ही पोस्ट @notcommonfacts नावाच्या इंस्टाग्राम हँडलने शेअर केली आहे. यावर त्यांनी लिहिले आहे की – सँड्रा वेनेगासने तिच्या वडिलांचा हा फोटो हॉस्पिटलमध्ये शेवटच्या क्षणांपूर्वी घेतला होता. तो आपत्कालीन कक्षाकडे जात आहे हे माहीत असूनही, एक समर्पित शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याने लॅपटॉप आणि चार्जर पॅक केले. दु:खाची गोष्ट म्हणजे त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. सँड्राने 2020 मध्ये तिच्या फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले.
हेदेखील वाचा – Momos आणि Dim Sums मध्ये काय फरक आहे? युजर्सचे मजेदार उत्तर ऐकून पोट धरून हसाल
ही व्हायरल पोस्ट पाहून आता अनेक युजर्स भावुक झाले आहेत. आपले शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षक कसा आपल्या विद्यार्थ्यांचाच विचार करतो, हे या व्हायरल पोस्टमधून दिसून येते. या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले, “शिकवणे ही त्यांची खरी आवड होती असे तुम्ही म्हणू शकता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, शेवटच्या क्षणापर्यंत ते आपले काम करत राहिले #respect”.