सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा भारताचा शेजारी देश पाकिटांमधीलदेखील अनेक व्हिडिओ सामील असतात. मात्र सध्या पाकिस्तामधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही बोलावेसे वाटेल की, पाकिस्तानहा शेवटी पाकिस्तानच! काय आहे प्रकरण ते जाणून घेऊयात.
सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती फार बिकट आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. लोकं अक्षरश: एक वेळच्या जेवणासाठीही तडफत आहेत. ज्यांच्याकडे थोडेफार शिक्षण आहे ते जग सोडून दुसऱ्या देशात सेटल होत आहेत. अशा परिस्थितीत एका विदेशी बिझनेसमॅनने पाकिस्तानात शॉपिंग मॉल सुरू केले होते. मात्र काही क्षणातच त्याला त्याच्या या निर्णयाचा पश्चाताप करावा लागला.
हेदेखील वाचा – बाइक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली, गळ्याला बसला फास अन् नंतर जे घडलं… घटनेचा Video Viral
झाले असे की, मॉल उघडताच पाकिस्तानच्या लोकांनी अक्षरशः हा मॉल लुटून काढला. कशी क्षणार्धात मॉलची झालेली दुरवस्था पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. लाखो लोक एकाच वेळी या मॉलमध्ये शिरले अन् त्यांनी वाट्टेल त्या वस्तू पळवून नेल्या. बिझनेसमॅनने करोडो रूपये खर्च करून हा देशातील सर्वात मोठा मॉल उभा केला होता. मात्र लोकांनी अक्षरशः त्याच मातेरं केलं आणि काही तासांतच त्या बिचाऱ्याला कंगाल करून सोडलं.
A businessman of Pakistan living abroad opened a huge mall in locality of Karachi, which he named Dream Bazaar. And today on day of inauguration he had announced a special discount Crowd of about one lakh stormed and looted the entire mall
https://t.co/DlNcxm2wzO— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 1, 2024
माहितीनुसार, हे मॉल पाकिस्तानमधील कराचीमध्ये सुरु करण्यात आलं होत. या मॉलच नाव ‘ड्रीम बाजार’ असे ठेवण्यात आलं होत. हा पाकिस्तानातील सर्वात मोठा मॉल असल्याचे सांगितले जात आहे, ज्याला क्षणार्धात पाकिस्तानच्या लोकांनी धुळीत मिळवलं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या मॉलमध्ये प्रत्येक वस्तूवर काही ना काही सूट देण्यात आली होती.विविध प्रकारचे ऑफर्स लावण्यात आले होते. मग काय सूट हा शब्द वाचताच लोकं अक्षरश: मॉलमध्ये तुटून पडली.
हेदेखील वाचा – गरीब फुगेवाल्याला बसवलं 5 कोटींच्या पोर्शे गाडीत, चिमुकलीचा आनंद पाहून डोळे पानावतील, हृदयद्रावक Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लाखो लोक कशी मॉलमध्ये शिरली आणि हातात मिळेल ती वस्तू घेऊन पळू लागली. या घटनेचा व्हिडिओ @Ghar Ke Kalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने म्हटलं, बिसनेस मॅनचा पाकिस्तानमध्ये मॉल ओपन कारण्याचा निर्णय फार चुकीचा होता. तसेच अनेकांनी आता बिसनेस मॅनसाठी खेद व्यक्त केला आहे.