(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
आता तंत्रज्ञान हे माणवासाठी फार नवीन नाही पण प्राणी किंवा पक्षी यांना याची काहीच माहिती नाही. अशात जेव्हाही त्यांच्या कोणत्या नव्या तंत्रज्ञानासोबत सामना होतो तेव्हा गोंधळतात आणि आपल्या बचावाचा प्रयत्न करतात. व्हिडिओतही पक्षांसोबत असंच काहीतरी घडून आलं. आकाशात एक ड्रोन उडत होता ज्याला पाहताच पक्षांमध्ये संभ्रम निर्माण झाला. जवळच असलेल्या आपल्या घरट्याला हा ड्रोन उधळवून लावणार या भितीने पक्षांनी त्याच्यासोबत युद्ध करायला सुरुवात केली. आपण व्हिडिओत पाहू शकतो, यात दिसतंय की दोन पक्षी ड्रोनचा पाठलाग करत त्याला मारायचा आणि खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित ड्रोन आपले घरटे उद्ध्वस्त करेल अशी भीती त्याच्या मनात असावी. आधुनिकता आणि निसर्गाची विसंगता व्हिडिओतून स्पष्ट दिसून येते.
A drone got caught in a fight with two birds who were strongly protecting their nest 🦅 pic.twitter.com/PRgxemy78S — Tansu Yegen (@TansuYegen) April 12, 2026
हा व्हिडिओ @TansuYegen नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आपल्या घरट्याचे निकराने रक्षण करणाऱ्या दोन पक्ष्यांशी एक ड्रोन भिडले.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हाहा, तसंही आकाशातील जागेचे (हवाई क्षेत्राचे) मालक तेच आहेत आणि आपण त्यांच्या एकांतपणाचा आदर केला पाहिजे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती पाती एखाद्या पक्ष्याचा सहज बळी घेऊ शकतात आणि कदाचित त्यामुळे तो ड्रोनही खाली कोसळेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ड्रोननी पक्षी किंवा त्यांच्या घरट्यांमध्ये व्यत्यय आणू नये. वन्यजीव आणि त्यांच्या जागेचा आदर करा. वन्यजीवांचा छळ करू नका!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






