Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई ही शेवटी आईच असते! बिळातून बाहेर खेचत श्वानाच्या पिल्लावर कोल्ह्याने चढवला हल्ला, मग आईने जे केलं… Video Viral

Animal Viral Video: पिल्लावर हल्ला करणं कोल्ह्याला चांगलच महागात पडतं, श्वानाची आई कोल्ह्याला असे फाडून टाकते की कोल्ह्याची पळताभुई एक होते. शिकारीचा हा मनोरंजक थरार सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2025 | 11:40 AM
आई ही शेवटी आईच असते! बिळातून बाहेर खेचत श्वानाच्या पिल्लावर कोल्ह्याने चढवला हल्ला, मग आईने जे केलं... Video Viral

आई ही शेवटी आईच असते! बिळातून बाहेर खेचत श्वानाच्या पिल्लावर कोल्ह्याने चढवला हल्ला, मग आईने जे केलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगलातील अनेक थरारक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. जंगलतील आयुष्य हे बरेच वेगळे असते ज्यामुळे इथल्या घटना नेहमीच लोकांना आकर्षित करत असतात. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी प्राणी शिकारीचा मार्ग निवडत असतात. या शिकारीचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर शेअर होतात तेव्हा लोक त्यातील दृश्ये पाहून हादरून जातात. सध्या देखील अशाच एक शिकारीचा व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे.

जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये काही प्राण्यांचा मुख्यत्वे समावेश होतो. तसेच जंगलातील चपळ प्राणी म्हटलं की, डोळ्यासमोर फक्त एकाच प्राणी दिसू लागतो तो म्हणजे कोल्हा. आपल्या चपळतेने तो प्राण्यांची शिकार करतो. सध्या सोशल मीडियावर कोल्ह्याच्या शिकारीचाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे मात्र यात कोल्ह्याची हार झाल्याचे दिसून आले आहे. जगात कोणीही कितीही बलाढ्य असला तरी असे म्हणतात की एका आईसमोर त्याचे काहीही चालू शकत नाही. आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते. कोल्ह्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. नक्की काय घडले ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

रिंग सेरेमनीच्या वेळी अचानक वराची फाटली पँट, वधूलाही हसू आवरेना; हास्याने लोटपोट करणारा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये एक कोल्हा चपळतेने एका श्वानाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसून येत आहे. यात घडते असे की, एक कोल्हा एका बिळाजवळ येतो यात श्वानाचे पिल्लू असल्याचे त्याला आधीच ठाऊक असते. मिळालेल्या संधीचा फायदा घेत कोल्हा त्या बिळाजवळ जातो आणि आपला हात त्यात टाकून अक्षरशः पिल्लाला खेचत बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. यात तो यशस्वीही होतो मात्र पिल्लाला आपली शिकार बनवणार तितक्यात मागून त्याच्या आईची एंट्री होते. कोल्हा आपल्या पिल्लाची शिकार करत असल्याचे पाहून ती भडकते आणि अजिबात वेळ न घालवता कोल्ह्यावर हल्ला चढवते. कोल्हाही यावेळी तिचा रुद्रावतार पाहून घाबरतो आणि तेथून पळून जातो. अशाप्रकारे एक आई आपल्या मुलाचे प्राण वाचवते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.

गरुड चिमुकल्याला हवेत उचलणार तितक्यात वडिलांनी केलं असं… शिकारीचा हा थरार पाहून हैराण व्हाल; Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @wildanimalshortsnature नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आई आपल्या पिल्लाला कोल्याच्या हल्ल्यापासून वाचवते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “स्वतःवर हल्ला झाल्यावरही असेच व्हिडिओ बनवा आणि लाइक्स मिळवा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” काय मजा घेताय, मी असतो तर नक्कीच त्याचा जीव वाचवला असता”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The fox attacked the puppy pulling it out of the den then suddenly mother came what happened next shocking animal video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Animal Attack
  • shocking viral news
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral
1

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral
2

माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral

थंड हवेत गरम मॅगी अन् थेट नोटांचा पाऊस… एका दिवसांतच कंटेंट क्रिएटरने केली तब्बल २१ हजारांच्या मॅगीची विक्री; Video Viral
3

थंड हवेत गरम मॅगी अन् थेट नोटांचा पाऊस… एका दिवसांतच कंटेंट क्रिएटरने केली तब्बल २१ हजारांच्या मॅगीची विक्री; Video Viral

हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral
4

हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.