रीलसाठी आईनेच मुलाचा जीव घातला धोक्यात; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, म्हणाले 'हा काय मुर्खपणा आहे'
सध्याच्या इंटरनेटच्या दुनियेत लोकांना सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. रील हा असा रोग लोकांना लागला आहे की लोक स्वत:च्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. सोशल मीडियावर असे असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. रील बनवताना लोकांना जीव गमवावा लागला आहे तरीही अनेकजण याचा विचार देखील करत नाहीत. सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आईनेच स्वत:सोबत बाळाचा जीव देखील धोक्यात घातला आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला रील बनवत आहे. अनेक जण रील बनवतात, पण ही महिला ज्या पद्धीतने आणि ज्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे ते पाहून संताप येणे स्वाभाविक आहे. ही महिला विहिरीच्या काठावर बसलेली असून तिच्या हातात एक मूल आहे. विहिरीत मुलाला टांगून महिला गाण्यावर रिल्स बनवत आहे. व्हिडीओ पाहून युजर्स संताप व्यक्त करत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला विहिराच्या कड्यावर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात एक मुल आहे. तिने मुलाला एका हाताने लटकवत पकडलेले आहे. आणि गाण्यावर अभिनय करत रील बनवत आहे. विहिरीमध्ये पाणी दिसत नाही. विहिर जास्त खोलही नाही. मात्र विहिरीमध्ये अनेक मोठे दगड आहेत मुल जर हातातून सटकले तर खाली पडून त्याला गंबीर दुखापत होण्याची शक्यता आहे. तसेच महिला मुलाला अगदी फक्त त्याच्या एकाच हाताला पकडले आहे. एका क्षण असे देखील झाले होते की ते मूल तिच्या हातातून काली पडले असते.
हे देखील वाचा – रेल्वे ट्रॅकवर बांधले कुत्र्याच्या पिल्लाला; व्हिडीओ पाहून लोक संतापले, म्हणाले…
व्हायरल व्हिडीओ
Family court in custody case: Only mother can love child more. Even more than father.
Le mother:#ParentalAlienation pic.twitter.com/mc1kl5ziFj— Raw and Real Man (@RawAndRealMan) September 18, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफर्म एक्सवर @RawAndRealMan अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या महिलेला मुर्ख म्हणले आहे. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की,’हा काय मूर्खपणा आहे की, या मूर्ख रीलसाठी ती तिचा आणि तिच्या मुलाचा जीव धोक्यात घालत आहे.’ आणखी एकाने लिहिले की, ‘जर तिचा मृत्यू झाला तर तिचे सासरचे लोक या व्हिडिओचा पुरावा म्हणून वापर करतील’ दुसऱ्याने लिहिले की,’पतीने पुराव्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करावा’ तसेच काहींनी तिला शिक्षा करावी असे देखील म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, आई असे करू शकते हे कधी वाटले नव्हते, उद्या ते मुल देखील तुमच्या सोबत असेच करतील.