(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये खरंतर वऱ्हाड्यांनी ताक या थंडगार पेयाची व्यवस्था केलेली असते. उन्हाळ्यात ताक हे पेय एक लोकप्रिय आणि सर्वाधिक पिले जाणारे ड्रींक आहे. अशात वऱ्हाड्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लग्नात एका जुगाडाने थेट नळातून ताक देण्याची सुविधा पुरवली जात होती. म्हणजेच जर वऱ्हाड्यांना ताक प्यायचं असेल तर त्यांना फक्त नळ खुलं करुन आपल्याला हवं तेवढे पेय पिऊन त्याचा आनंद लुटायचा आहे. लग्नातील या जुगाडाने संपूर्ण वऱ्हाडी मंडळी खुश झाली, काहींनी ग्लासात ताक भरुन पिले तर काहींनी बाटलीत भरुन ताकची मजा लुटली. पाण्याऐवजी नळातून ताक देण्याची ही कल्पना खरोखर अनोखी आणि आश्चर्यकारक असून नातेवाईकांना ही युक्ती चांगलीच आवडल्याचे व्हिडिओत दिसले. व्हिडिओतील कॅप्शननुसार, वरात निघून गेल्यानंतरही टँकर भरुन ताक शिल्लक राहिली होती, ज्यानंतर संपूर्ण गावाला ताक पिण्यासाठी आमंत्रण करण्यात आलं.
दरम्यान ही घटना पाटणमधील एका लग्नसमारंभात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. शेवटी म्हणतात ना लोकांना आनंदी करण्याचा खरा मार्ग हा त्यांच्या पोटातून जात असतो. आज ही गोष्ट आपल्याला व्हिडिओतून खरी होताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ @mr.ali_brh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘लग्नात ताकाचा पाऊस पडला; एक टँकर शिल्लक राहिला होता, म्हणून गावकऱ्यांना बोलावण्यात आले’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “गुजरातमधील आमच्या गावांमध्ये ताक मोफत मिळते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ, ते लग्न नव्हतं, तिथे मोदीजी आले होते. म्हणून हे सर्व केलं होतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आणि तिथे झालेल्या एवढ्या कचऱ्याचं काय, कोण साफ करेल ती घाण”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






